मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर त्यांच्या आगामी 'तन्वी द ग्रेट' चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल खूप उत्सुक आहेत. आज, 14 एप्रिल रोजी, अभिनेत्यानं त्याच्या दिग्दर्शित चित्रपटाच्या प्रीमियरबद्दल एक अपडेट शेअर केला आहे. अनुपम खेरनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, जी पाहून चाहते आनंदी झाले आहेत. अनुपम खेर दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील मार्चे डू फिल्ममध्ये होणार आहे. अनुपम खेर कलाकार आणि क्रू मेंबर्ससह स्क्रिनिंगची ओळख करून देतील, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहेत. दरम्यान अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कान्स फिल्म फेस्टिव्हलचे पोस्टर शेअर केले आहे, यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर कान्समध्ये होणार आहे.
अनुपम खेरचा आगामी चित्रपट : ही आनंदाची बातमी शेअर करताना 'द काश्मीर फाइल्स'च्या अभिनेत्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वर्ल्ड प्रीमियर!' जागतिक दर्जाचे अभिनेते अनुपम खेर यांचा दिग्दर्शन असलेला 'तन्वी द ग्रेट' चित्रपट जागतिक मंचावर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. मार्चे डू फिल्ममध्ये त्याचे प्रदर्शन सुरू होत आहे, हा एका क्षणापेक्षा जास्त आहे, ही एका जागतिक प्रवासाची सुरुवात आहे. अनुपम खेर स्टुडिओ 'तन्वी द ग्रेट'ला जगभरात घेऊन जात आहे, कान्स, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस येथे त्याचे प्रदर्शन सुरू होईल. आम्ही नुकतीच सुरुवात करत आहोत!'
'तन्वी द ग्रेट' स्क्रिनिंग : कान्स चित्रपट महोत्सवाच्या प्रीमियरमधून लंडन, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिससह प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या जागतिक दौऱ्याची सुरुवात होईल, यामुळे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. आता या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार आहे. 'तन्वी द ग्रेट' हा अनुपम यांचा दुसरा दिग्दर्शित चित्रपट आहे. याआधी त्यांचा 2002मध्ये अनिल कपूर, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन स्टारर 'ओम जय जगदीश' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर काही विशेष कामगिरी करू शकला नाही. आता अनुपम खेर यांना 'तन्वी द ग्रेट' चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
हेही वाचा :
- 70व्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी आईसह भावाबरोबर गंगा घाटावर केली पूजा-अर्चना, व्हिडिओ व्हायरल
- "डॉ. मनमोहन सिंग आंतर्बाह्य चांगले व्यक्ती होते...", म्हणत अनुपमनं दिला त्यांच्या आठवणींना उजाळा
- अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह जोगेश्वरीतून अटक - Theft at Anupam Kher office