मुंबई - बीटीएस, ज्याला 'बँगटन बॉईज' आणि 'बुलेटप्रूफ बॉय स्काउट्स' म्हणून ओळखले जाते. या बॅन्डची सुरुवात २०१० मध्ये झाली, जेव्हा दक्षिण कोरियातील सियोलमधील बिग हिट एंटरटेनमेंटचे सीईओ बँग सी-ह्युक यांना रॅपर आरएम उर्फ किम नाम-जूनबरोबर काही असे मुले हवे होते, जे डान्स आणि गायनात कुशल असेल. त्यांना एक हिप हॉप ग्रुप तयार करायचा होता. २०१२मध्ये आरएमसह किम तेह्युंग उर्फ व्ही , किम सेओक-जिन उर्फ जिन, मिन योंगी उर्फ सुगा, पार्क जी-मिन उर्फ जिमिन, जियोन जंग-कूक उर्फ जंगकूक आणि जंग होसेक उर्फ जे-होप हे सदस्य या बॅन्डमध्ये सामील झाले. या बॅन्डला बीटीएसच्या नावानं एक ओळख मिळाली.
कमी वयात मिळाली प्रसिद्धी : के -पॉपच्या जगात या बॅन्ड नाव खूप मोठ आहे. या बॅन्डच्या सदस्यांनी कमी वयात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. या बॅन्डच्या जगभरात चर्चा असून त्यांना एक नजर पाहण्यासाठी अनेकजण आतुर असतात. या बॅन्डनं अनेक कॉन्सर्ट केले आहेत. बीटीएस सदस्यांनी अनेक मुलाखातीत म्हटलं आहे, की इथपर्यंत जाणं हे त्याच्यासाठी सोप नव्हतं, या बॅन्डनं सुरुवातीच्या काळामध्ये खूप संघर्ष केला आहे. साऊथ कोरियामध्ये या बॅन्डकडे अनेक पत्रकार आणि दुर्लक्ष करत असत, आज या बॅन्डनं त्यांच्या मेहनतीच्या जोरावर जग जिंकलं आहे. २०१२ मधील या सात सदस्यांचा बॉय बॅन्ड आज जगावर राज्य करत आहे.
BTS IS BACK~💜
— Hallie | 𝐅𝐄𝐒𝐓⟭⟬⁷ (@j1nzhu0o_) June 6, 2025
Wow so much support for BTS on their military comeback. So happy to see BTS everywhere to welcome them back!🥹💜 pic.twitter.com/aUnaTyJGW4
📸 PHOTO
— BTS News & Updates (@dalbitbangtan) June 10, 2025
Our favorite snapshots of @BTS_twt RM & V today 🥹🫶💜 pic.twitter.com/V4ez9LCnEx
जगभरात लोकप्रिय : दरम्यान २०१३ मध्ये, या बीटीएस बॅन्डनं '२ कूल ४ स्कूल' या अल्बमद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. बीटीएसनं जगभरातील अनेक संगीत पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय त्यांचा जगभरात 'आर्मी' नावाचा मोठा चाहतावर्ग आहे. दरम्यान बीटीएसनं बेनी ब्लँको, मेगन थी स्टॅलियन, स्नूप डॉग, हॅल्सी, कोल्डप्ले आणि निकी मिनाज यांच्यासह सहकार्य करून धमाका केला आहे. बीटीएसच्या हिट गाण्यांमध्ये 'डायनामाइट', 'फेक लव्ह', 'फायर', 'रन बीटीएस', 'बटर', 'डीएनए',' माइक ड्रॉप' आणि अशा अनेक सुंदर अल्बमचा समावेश आहे. २०१८मध्ये बिलबोर्डवर सामाजिक कलाकार म्हणून बीटीएसचे नाव देखील देण्यात आले. यानंतर २०२३ मध्ये बिलबोर्डनं बीटीएसला टॉप २०० कलाकारांमध्ये देखील समाविष्ट केले. याशिवाय बिलबोर्ड चार्टमध्ये बीटीएसचं 'डायनामाइट' हे गाणं पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्समध्ये बीटीएस सदस्यांनी 'आर्टिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकन पुरस्कार समारंभात अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत, ज्यात पाच ग्रॅमी नामांकनांचा समावेश आहे. ३१ मे २०२२ रोजी बीटीएसनं व्हाईट हाऊसमध्ये भेट दिली, जिथे त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बाइडन यांच्याबरोबर आशियाई आणि अमेरिकन द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या वाढत्या प्रकरणांवर चर्चा केली होती. हा पहिला आशिया बॅन्ड आहे, ज्यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. तसेच संगीताव्यतिरिक्त, बीटीएसमधील सदस्य हे सकारात्मक संदेश पसरवण्याचे आणि तरुणांना प्रेरणा देण्याचे काम देखील करत आहेत.
हेही वाचा :