मुंबई - स्टँड अप कॉमेडियन कुमाल कामराशी संबंधित सर्व सूची आणि त्याचा कंटेंट काढून टाकण्याचा निर्णय बुकमायशोनं घेतल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर टीका होऊ लागली आहे. एप्रिलच्या पाच तारखेपासून बुकमायशोनं कुमाल कामराची सर्व सूची आणि सामग्री हटवल्यानंतर हॅशटॅग बायकॉट बुकमायशो हा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहे. मात्र अद्यापही याबाबत कंपनीकडून कुठलही निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. कुणाल कामरानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर केल्यामुळं ही कारवाईसूडबुद्धीनं केल्याचा आणि राजकीय दबावाला बुकमायशो ही कंपनी बळी पडल्याचा कयास सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त करत आहेत.
कुणाल कामरानं त्याच्या 'नया भारत' या नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कथितपणे टिप्पणी केली होती. त्यानं शिंदे यांचं थेट नाव घेतलं नसलं तरी 'गद्दार' हा शब्दप्रयोग केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या समर्थकांमधून संताप व्यक्त झाला. कामराच्या विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआरही दाखल झाली. या घटनेचा परिणाम म्हणून हा शो जिथं चित्रीत झाला त्या 'द हॅबिटेट क्लब'ची तोडफोड शिंदे समर्थकांनी केली होती.
Maharashtra ❤️❤️❤️ pic.twitter.com/FYaL8tnT1R
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
बुक माय शोच्या सूचीतून कुणाल कामराला हटवलं - शिवसेना सिंदे गटाचे युवा नेते राहूल एन कनाल यांनी बुकमायशो या तिकीट अॅपला औपचारिक पत्र लिहून कुणाल कामराला त्याचं व्यासपीठ देऊ नये आणि त्याला यादीतून वगळण्याची विनंती केली. अशा प्रकारे राजकीय दबाव तयार झाल्यानंतर तातडीन बुकमायशोनं ५ एप्रिल रोजी कामराशी संबंधित तिकीट यादी आणि कलाकारांची माहिती समाविष्ट असलेली सामुग्री हटवली. शिवसेना युवा नेते कनाल यांनी कामरा याच्यावर सार्वजनिक नेत्यांची बदनामी केल्याचा आणि कॉमेडीच्या नावाखाली फुटीरतावादी कथनाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला. यानंतर बुकमायशोचं आभार मानणाऱ्या पत्रात राहुल कनाल यांनी त्यांचे पोर्टल स्वच्छ ठेवल्याबद्दल आणि वैयक्तिक अजेंडे असणाऱ्या सामाजिक सलोखा बिघडू शकतात अशा कलाकाराला काढून टाकल्याबद्दल व्यासपीठाचे कौतुक केलं होतं.
How to kill an Artist “Democratically” pic.twitter.com/9ESc9MZfWr
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 1, 2025
कुणाल कामराची प्रतिक्रिया - यानंतर कुणाल कामरा स्वस्थ बसला नाही, परंतु अतिशय शांतपणे त्यानं प्रतिक्रिया दिली. "नमस्कार बुकमाय शो, माझ्या शोची यादी करण्यासाठी तुमच्याकडे तुमचं प्लॅटफॉर्म आहे का याची कृपया तुम्ही पुष्टी करू शकाल का? जर नसेल, तर ठीक आहे. मला काय ते समजले..." अशी पोस्ट लिहिली. ही पोस्ट जरी वरवर नम्र वाटत असली तरी बुकमायशोसारख्या कंपनीला त्यानं विचारलेला हा जाब होता असाच अनेकांनी अर्थ काढला. यानंतर कुणाल कामराचे समर्थक एकत्र आले आणि त्यांनी हॅशटॅग बायकॉट बुकमायशो ट्रेंड करण्यास सुरुवात केली. या घटनेतनं जे दिसलं ते राजकीय सेन्सॉरशिपचे भयानक उदाहरण असल्याचं नेटिझन्सचं मत पडलं. सोशल मीडिया टाइमलाइन युजर्सनी लोकांना अॅप अनइंस्टॉल करण्याचे आणि त्याचे स्क्रीनशॉट शेअर करण्याचे आवाहनही केलं.
I have decided to boycott @bookmyshow for removing all shows of @kunalkamra88 from their platform. I urge all democratic citizens of India who value our Constitution to join me in the #BoycottBookMyShow movement.#IndiaStandsWithKunalKamra#IStandWithKunalKamra #KunalKamra" pic.twitter.com/8OkXFoI9YU
— APOORV MISHRA (@aapkaapoorv) April 6, 2025
कुणाल कामराला न्यायालयाकडून दिलासा - कुणाल कामराच्या विरोधात मुंबईसह तीन टिकाणी एफआयआर दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्याच्या पवित्र्यात मुंबई पोलीस आहेत. परंतु मुंबईत आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यानं मद्रास हायकोर्टीकडे अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आणि त्याला 7 एप्रिलपर्यंत जामीन मजूर झाला होता. आज कोर्टानं त्याला ही अंतरिम अटकपूर्व जामीनासाठी मुदतवाढ दिली असून 17 एप्रिलपर्यंत त्याच्यावर कारवाई होऊ शकणार नाही. दरम्यान, त्यानं मुंबई हायकोर्टामध्ये एफआयआर रद्द करण्याबाबत धाव घेतली असून त्याची सुनावणी होणार आहे.
My Statement - pic.twitter.com/QZ6NchIcsM
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 24, 2025
हेही वाचा -
कुणाल कामराच्या अंतरिम अटकपूर्व जामीनला 17 एप्रिलपर्यंत मुदत वाढ, मद्रास हायकोर्टाचा निर्णय
कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; मंगळवारी होणार सुनावणी