मुंबई - Bigg Boss Marathi Season 5 : कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन खूप चर्चेत आहे. घरातील वाद, गटामधील राजकारण पहिल्या आठवड्यापासून पाहायला मिळत आहे. 7 ऑगस्ट रोजी सीझनचं दुसरं नॉमिनेशन पार पडणार आहे. काल रात्रीच्या एपिसोड नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील सहा सदस्य नॉमीनेट झाले. यामध्ये निखिल दामले, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, घनश्याम दरवडे, निक्की तांबोळी आणि पंढरीनाथ कांबळे हे सदस्य नॉमीनेट झाले आहेत. यापूर्वी सूरज आणि योगिता पहिल्या आठवड्यातही नॉमीनेट झाले होते. आता कुठला सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे.
कोणाला मतं जास्त पडली : 'बिग बॉस मराठी' इरा या इन्स्टाग्राम पेजनं लेटेस्ट व्होटिंग ट्रेण्ड पोस्ट केला आहे. यात लेटेस्ट व्होटिंग ट्रेण्डनुसार सूरज चव्हाण पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्याला प्रेक्षकांनी खूप मतं दिली आहेत. याशिवाय निक्की तांबोळीला देखील प्रेक्षकांनी खूप मतं दिली आहेत. तसंच तिसऱ्या स्थानावर योगिता चव्हाण आहे. तिनं कॅप्टन्सी टास्क खूप चांगल्या पद्धतीनं खेळला होता, यानंतर ही गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडली होती. याशिवाय निखिल दामले चौथ्या स्थान, पंढरीनाथ कांबळे पाचवं स्थान, घनश्याम दरवडे सगळ्यात शेवटी सहाव्या स्थानावर आहे.
आर्या जाधवनं केल्या प्रेमाच्या भावना व्यक्त : पंढरीनाथ कांबळे आणि घनश्याम यांना कमी मतं पडली आहेत. त्यामुळे आता दोघंही अडचणीत असल्याचं दिसत आहेत. याआधी बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील घराबाहेर पडले होते. त्यांची घरामध्ये इन्वॉलमेंट कमी असल्याचं हे प्रेक्षकांना खटकलं होतं. दरम्यान काही वेळापूर्वी बिग बॉस निर्मात्यांकडून प्रोमो शेअर करण्यात आला होता. यामध्ये आर्या जाधव ही बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाणला आपल्या भावना सांगताना दिसली. आर्या ही वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहेत. मात्र बिग बॉसच्या घरात इरिना रूडाकोवा आणि वैभवमध्ये लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार हे काही दिवसात कळेल.
हेही वाचा :