ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'च्या पहिल्या कॅप्टन्सी बुलेट ट्रेन टास्कमध्ये होणार राडा, पाहा प्रोमो - first captaincy bullet train task

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अरबाज पटेल हा अभिजीत सावंतबरोबर भांडताना दिसत आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 12:20 PM IST

Bigg Boss Marathi Season 5
'बिग बॉस मराठी सीझन 5 (instagram)

मुंबई - Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी सीझन 5' हे प्रेक्षकांंचं खूप मनोरंजन करत आहे. या शो मध्ये रोज वेगवेगळ्या कारणांमुळे भांडणं होत आहेत. आज, 6 ऑगस्ट रोजी 'बिग बॉस'मध्ये 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' टास्क पार पडणार आहे. आता या टाक्समध्ये कोण बाजी मारेल, हे काही वेळात समजेल. तसंच पाचव्या सीझनचा पहिला कॅप्टन होणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. कॅप्टनसीच्या टास्कमध्ये अनेकदा भांडणं पाहायला मिळतं. 'बिग बॉस'च्या घरात दोन गट पडले आहेत. एका गटात वैभव चव्हाण, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक आहेत.

'बिग बॉस मराठी 5'चा प्रोमो रिलीज : तसेच दुसऱ्या गटात अभिजीत सावंत, अंकिता प्रभू वालावलकर, आर्या जाधव, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळे हे स्पर्धक तगडी टक्कर देताना दिसतील. 'बिग बॉस'च्या घरात 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' टास्क आज खेळला जाईल. आता 'बिग बॉस'च्या निर्मात्यांनी एक प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोत टास्कदरम्यान अभिजीत सावंत आणि अरबाज पटेलमध्ये जोरदार भांडण होताना दिसत आहे. यानंतर अरबाज हा घरातील सर्व सदस्यांवर राग काढतो. टास्कमध्ये अरबाज म्हणतो, "तुम्ही सगळे बघा, मी कुणालाच ट्रेनच्या आत बसू देणार नाही." ही धमकी देत तो घरातील सर्व सदस्यांवर ओरडतो. यानंतर दुसरीकडे अंकिता टास्कदरम्यान 'बिग बॉस' प्लीज मला हर्ट होतंय." असं म्हणते.

कोण होणार कॅप्टन ? : आता हा व्हायरल झालेला प्रोमो हा अनेकांना आवडत आहे. 'बिग बॉस'च्या घरातील पहिली कॅप्टन अंकिता प्रभू वालावलकर होणार असल्याच्या सध्या चर्चा सोशल मीडियावर चालू आहेत. तसेच आता 'बिग बॉस'चा नवा प्रोमो पाहून अनेकजण यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं या प्रोमोमध्ये लिहिलं, "हा अरबाज खूप दादागिरी करतोय." दुसऱ्या एकानं लिहिलं, "अरबाज पटेल नाही अफजल खान आहे." आणखी एकानं लिहिलं, "त्या अरबाजला बाहेर काढा." एकूणच आज रात्रीचा एपिसोड हा खूप मनोरंजक असणार आहे, असं सध्या तरी वाटतंय.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी सीझन 5'मध्ये पुरुषोत्तम दादा पाटील बाहेर पडणारे पहिले स्पर्धक, प्रोमो व्हायरल - BIGG BOSS MARATH 5
  2. रितेश देशमुखनं केलं 'बिग बॉस मराठी सीझन 5'मध्ये 16 स्पर्धकांचं स्वागत - Bigg Boss Marathi 5
  3. 'बिग बॉस मराठी 5' मध्ये कोणते सेलिब्रिटी स्पर्धक असणार? ग्रँड प्रिमिअरनंतर आजपासून सुरू होणार शो - bigg boss marathi season 5

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.