ETV Bharat / entertainment

'बिग बॉस 18'च्या पहिला प्रोमोसह थीम रिलीज, सलमान खान करणार 'टाईमचा तांडव' - BIGG BOSS 18

Bigg Boss 18 :'बिग बॉस 18'चा पहिला प्रोमो आणि थीम रिलीज झाली आहे. यावेळी सलमान खानच्या टीव्ही रिॲलिटी शोमध्ये टाईमचा तांडव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 12:33 PM IST

Bigg Boss 18
बिग बॉस 18 (सलमान खान (ANI- @beingsalmankhan Instagram))

मुंबई - Bigg Boss 18 : 'बिग बॉस 18'चा बहुप्रतीक्षित पहिला प्रोमो निर्मात्यांनी सोमवारी रात्री, 16 सप्टेंबर रिलीज केला. हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहते आणि प्रेक्षकांमध्ये शोबाबत उत्सुकता वाढली आहे. हा शो सलमान खान होस्ट करणार आहे. या रिॲलिटी शोची थीमही निर्मात्यांनी प्रोमोत शेअर केली आहे.

'बिग बॉस 18' शोमध्ये 'टाईमचा तांडव' ही थीम सादर केली जात आहे. 'बिग बॉस' सीझन 18 चा प्रोमो रिलीज करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एंटरटेनमेंटची इच्छा पूर्ण होईल, जेव्हा टाईमचा तांडव बिग बॉसमध्ये नवीन ट्विस्ट घेऊन येईल. तुम्ही सीझन 18 साठी तयार आहात का?' हा प्रोमो कलर्स टीव्हीनं शेअर केला आहे.

Bigg Boss 18
'बिग बॉस 18 ((salmankhan Instagram))

'बिग बॉस 18'चा प्रोमो प्रदर्शित : या प्रोमोमध्ये बॅक ग्राऊंडला सलमान खानचा आवाज ऐकाला मिळत आहे. यात तो म्हणतो, 'बिग बॉस पाहणार घरातील सदस्यांचं भविष्य, आता होणार टाईमचा तांडव.' प्रोमो शेअर होताच चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "भाईजान परत आला आहे, आता मजा येईल." दुसऱ्या एकानं लिहिलं,"यावेळी सलमान भाई होस्ट करत आहे. तर शो मी नक्की पाहणार आहे. " आणखी एकानं लिहिलं, "यावेळी टीआरपी येणार आहे." याशिवाय अनेकजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. बिग बॉसचा होस्ट म्हणून सलमान पुन्हा दिसणार असल्यानं त्याचे चाहते खूश असल्याचं दिसत आहे.

'बिग बॉस 18' ची पहिली स्पर्धक : याआधीही निया शर्माला या शोसाठी अप्रोच करण्यात आलं होतं, परंतु काही कारणास्तव ती या शोचा भाग होऊ शकली नाही. मात्र, ती येत्या आठवड्यात 'लाफ्टर शेफ' शो सोडू शकते. मिळालेल्या माहितीनुसार टीव्ही अभिनेता जान खान, चाहत पांडे, अंजली आनंद, दिग्विजय राठी आणि 'स्त्री 2'चा 'सरकटा' फेम अभिनेता सुनील कुमार या शोमध्ये असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस ओटीटी 3'चा विजेता आणि कॉमेडियन मुनावर फारुकी, मनीषा राणी, एल्विश यादव यांचीही नावे सध्या चर्चेत आहेत.' बिग बॉस 18' शो ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.