ETV Bharat / entertainment

आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा दुसऱ्यांदा स्तनाच्या कर्करोगाची ठरली बळी, पोस्ट करून केला धक्कादायक खुलासा - WORLD HEALTH DAY 2025

जागतिक आरोग्य दिनानिमित्त, बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनं तिला दुसऱ्यांदा स्तनाचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्याचं उघड केलंय.

Tahira kashyap
ताहिरा कश्यप (आयुष्मान खुराना-ताहिरा कश्यप (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 7, 2025 at 5:25 PM IST

2 Min Read

मुंबई : जागतिक आरोग्य दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनं तिच्या चाहत्यांना एक धक्कादायक बातमी दिली आहे. चित्रपट निर्माती-लेखिका ताहिरा पुन्हा एकदा स्तनाच्या कर्करोगाची बळी ठरली आहे. ताहिरानं सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त, ताहिरा कश्यपनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या दुसऱ्या स्तनाच्या कर्करोगाशी झालेल्या लढाईबद्दल खुलासा केला आहे. तिच्या पोस्टमध्ये तिनं सांगितलं की, तिला पुन्हा एकदा स्तनाचा कर्करोग कसा आढळला आहे.

ताहिरा कश्यप झाली पुन्हा स्तनाच्या कर्करोगाची शिकार : ताहिरानं तिच्या पोस्टमध्ये एक टीप जोडली ज्यामध्ये तिनं लिहिलं आहे, 'सात वर्षांचा त्रास किंवा नियमित स्क्रीनिंगची ताकद - हा एक विचार आहे, मला नंतरच्या विचाराबरोबर जायचे होतं आणि ज्यांना नियमित मॅमोग्राम करण्याची आवश्यकता आहे, त्यांनाही तेच सुचवायचे होते.' माझ्यासाठी दुसरा राउंड... माझ्याबरोबर पुन्हा तेच घडलं.' तसेच तिनं आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं 'जेव्हा आयुष्य तुम्हाला लिंबू देईल, तेव्हा तुम्ही लिंबूपाणी बनवा. जेव्हा आयुष्य खूप उदार असते, तेव्हा ते पुन्हा तुमच्यावर फेकले जाते, म्हणून तुम्ही ते शांतपणे तुमच्या आवडत्या काला खट्टा पेयामध्ये पिळून त्याचा आनंद घ्या, कारण ते एक चांगले पेय आहे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला माहित आहे की तुम्ही पुन्हा एकदा तुमचे सर्वोत्तम द्याल. नियमित मॅमोग्राम तपासणी करा आणि पुन्हा एकदा, स्तनाचा कर्करोग म्हणण्यास लाजू नका. विडंबना असो वा नसो, आज जागतिक आरोग्य दिन आहे, म्हणून आपण आपल्या क्षमतेनुसार स्वतःची काळजी घेण्यासाठी जे काही करू शकतो ते करूया. आभारी आहे.'

चाहत्यांनी दिली ताहिराला हिम्मत : या बातमीनंतर चाहते पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये ताहिराला पुन्हा एकदा हिम्मत देत आहेत. याशिवाय अनेकजण ती लवकर बरे झाली पाहिजे यासाठी प्रार्थना करत आहेत. ताहिराचा स्टार पती आयुष्माननं तिला हिंम्मत देत कमेंट सेक्शनमध्ये 'माझा हिरो' असं लिहिलं आहे. 2018 मध्ये ताहिराला पहिल्यांदा स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. 'शर्माजी की बेटी' या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटासाठी ओळखल्या जाणाऱ्या ताहिरा नेहमीच या आजाराबद्दल लोकांना जागृत करत असते. तिनं तिच्या शस्त्रक्रियेच्या जखमा देखील सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या.

हेही वाचा :

  1. आयुष्मान खुरानाला पत्नी ताहिरा कश्यपनं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट व्हायरल - ayushmann khurrana birthday
  2. आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना स्टारर हॉरर कॉमेडी 'थामा' चित्रपट होईल 'या' दिवशी रिलीज...
  3. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आयुष्मान खुरानावर चाहत्यानं उडवले डॉलर, अभिनेत्यानं दिली अशी प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.