ETV Bharat / entertainment

'एप्रिल मे ९९'चा टीझर झाला रिलीज, चाहत्यांनी दिल्या विशेष प्रतिक्रिया... - APRIL MAY 99 MOVIE

'एप्रिल मे ९९' चित्रपटाचा टीझर हा प्रदर्शित करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचा टीझर हा अनेकांना आवडत आहेत.

April may 99 movie teaser
'एप्रिल मे ९९' चित्रपट टीझर (April may 99 movie teaser Poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 14, 2025 at 3:07 PM IST

1 Min Read

मुंबई - पूर्वी उन्ह्याळाची सुट्टी पडली की बच्चेकंपनी गावी पळत असे. तेव्हाच्या सुट्ट्या म्हणजे मोकळ्या आभाळाखाली गावात मनसोक्त भटकणं, नदीच्या काठावर खेळणं, सायकलवरून गाव पालथं घालणं, वाऱ्यावर झुलणं आणि बर्फाचे गोळे चाखत उन्हाची मजा लुटणं. परंतु आजच्या डिजिटल युगात असे काही घडताना दिसत नाही. मुलं लॅपटॉप अथवा मोबाईलवर गेम्स खेळताना दिसतात. मैदानी खेळांना जवळपास पूर्णविराम मिळाल्यासारखा दिसतोय. परंतु बच्चेकंपनीची यंदाची उन्हाळी सुट्टी यादगार बनविण्यासाठी येतोय 'एप्रिल मे ९९' हा चित्रपट. नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. हा टीझर अनेकांना आवडला आहे. अनेकजण आपल्या प्रतिक्रया या टीझरच्या पोस्टवर लिहित आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'खूप चांगला टीझर आहे, हा चित्रपट नक्की चित्रपटगृहांमध्ये पाहायला पाहिजे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'चांगल्या, शाळेतल्या आठवणी जाग्या केल्या.' याशिवाय अनेकजण यावर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून या चित्रपटाच्या टीझरचं कौतुक करताना दिसत आहेत.

'एप्रिल मे ९९' चित्रपटाचं टीझर प्रदर्शित : 'एप्रिल मे ९९'च्या टीझरमधून जुन्या आठवणींचा सुकुमार प्रवास दिसत आहे. तसेच कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तीन धम्माल दोस्तांच्या बालसुलभ खोड्यांनी भरलेल्या या टीझरमधून लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणी जाग्या होतील. उन्हाचा तडाखा असह्य होत असताना, सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झालेला 'एप्रिल मे ९९'चा धमाकेदार टीझर ही उन्हाची काहिली कमी करणारी ट्रीटमेन्ट ठरतेय. या चित्रपटाच्या टीझरमध्ये 'जाई' हे एक रहस्यमयी पात्र झळकताना दिसतंय. ही 'जाई' नेमकी कोण आहे, हे उलगडायला मात्र प्रेक्षकांना थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे.

April may 99 movie teaser
'एप्रिल मे ९९' चित्रपट टीझर (April may 99 movie - (Photo Reporter))

'एप्रिल मे ९९' चित्रपटाबद्दल : मापुस्कर ब्रदर्स, फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक, आणि मॅगीज पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमानं साकारलेला हा चित्रपट रोहन मापुस्कर यांनी लिहून दिग्दर्शित केला आहे. निर्मितीची धुरा राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून यांनी सांभाळली असून लॉरेन्स डिसोझा सह-निर्माते आहेत. चित्रपटात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात आणि मंथन काणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. दिग्दर्शक रोहन मापुस्कर यांच्या मते, 'एप्रिल मे ९९’, हा केवळ चित्रपट नाही, तर जुन्या आठवणींचा अल्बम आहे. निर्माते राजेश मापुस्कर म्हणाले की, 'कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांची मैत्री तसेच त्यांचा मिश्कीलपणा पाहून प्रेक्षक नक्कीच आपल्या बालपणीच्या मित्रांच्या आठवणीत रमतील." यंदाची उन्हाळ्याच्या सुट्टी कुल करण्यासाठी 'एप्रिल मे ९९' हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.