मुंबई: साऊथ स्टार अल्लू अर्जुन आज, 8 एप्रिल रोजी आपला 43वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी, अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीनं तिच्या पतीसाठी एक भव्य आणि खाजगी पार्टी आयोजित केली होती. स्नेहानं या खाजगी पार्टीमधील एक फोटो शेअर करत पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त, त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच, 'पुष्पराज'च्या खऱ्या आयुष्यातील 'श्रीवल्ली'नं त्याला खास पद्धतीनं शुभेच्छा देत लिहिलं, 'माझ्या आयुष्यातील प्रेमाला 43व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. तुमचे आनंद, शांती, चांगले आरोग्य आणि शक्तीनं भरलेले वर्ष जावो अशी शुभेच्छा. आयुष्यभर तुमच्याबरोबर चालल्याबद्दल मी नेहमीच आभारी राहीन. लव यू एंडलेस.' या फोटोमध्ये अल्लू अर्जुन त्याच्या कुटुंबासह कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे.
अल्लू अर्जुनचा वाढदिवस : याशिवाय स्नेहानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा खास क्षण शेअर करताना कॅप्शनमध्ये 'हॅपी बर्थडे' लिहिलं आहे. तसेच तिनं या पोस्टवर हार्ट आणि काही इम्युलेट इमोजी जोडले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील स्टायलिश स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुननं त्याच्या उत्कृष्ट अभिनय आणि डान्सनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यानं 'आर्य', 'रेस गुरुम', 'सरैनोडू', पॅन इंडिया चित्रपट 'पुष्पा: द राईज' आणि 'पुष्पा 2: द रुल' सारख्या हिट चित्रपटांद्वारे साऊथ चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली आहे. 'पुष्पराज'चा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अल्लू अर्जुनला 'पुष्पा: द राईज' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
अल्लू अर्जुनचं वर्कफ्रंट : अल्लू अर्जुन शेवटी 'पुष्पा 2: द रुल'मध्ये दिसला होता. त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी, त्यानं प्रसिद्ध चित्रपट निर्माते अॅटली यांच्याशी हातमिळवणी केली आहे. 4 एप्रिल रोजी, अल्लू अर्जुन त्याच्या आगामी मोठ्या बजेटच्या मनोरंजन चित्रपटाबद्दल प्रोडक्शन हाऊस सन पिक्चर्स आणि दिग्दर्शक अॅटली यांच्याशी बैठक घेण्यासाठी चेन्नईला पोहोचला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त याची घोषणा केली जाईल.
हेही वाचा :