कार अपघातानंतर विजय देवरकोंडानं शेअर केली पोस्ट, चाहत्यांना मिळाला दिलासा...
विजय देवरकोंडाच्या कार अपघाताची बातमी सर्वत्र पसरली होती. आता यानंतर अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : October 7, 2025 at 11:31 AM IST
मुंबई : साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विजय देवरकोंडाच्या कारचा सोमवारी तेलंगणाच्या जोगुलंबा गडवाल जिल्ह्यात अपघात झाला. सुदैवानं अभिनेत्याला जखमी झाला नाही. हा अपघात अभिनेता आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथून हैदराबादला परतत असताना घडला. या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आणि अभिनेत्याच्या कार अपघाताची बातमी सोशल मीडियाच्या माध्यामातून खूप वेगानं पसरली आहे. दरम्यान विजयनं या घटनेनंतर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानंतर त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
कशी घडली घटना : मिळालेल्या माहितीनुसार एक बोलेरो कार अचानक उजवीकडे वळली आणि विजयच्या लेक्सस कारला धडकली. कारच्या डाव्या बाजूला नुकसान झालंय, मात्र सुदैवानं कोणीही जखमी झालेली नाही. अपघातावेळी विजय आणि इतर दोन लोक कारमध्ये होते. घटनेनंतर लगेचच, अभिनेत्याच्या टीमनं स्थानिक पोलिसांकडे विम्यासाठी तक्रार दाखल केली. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, अपघात किरकोळ होता आणि कोणीही जखमी झाले नाही. विजय ताबडतोब दुसरी कार घेऊन प्रवासाला निघाला. विजयनं काल रात्री त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत या घटनेबद्दल स्पष्टीकरण दिलं. त्यानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं,'सर्व काही ठीक आहे, गाडीचे नुकसान झाले आहे, पण आम्ही सर्व ठीक आहोत.' यानंतर त्यानं पुढं पोस्टमध्ये लिहिलं, 'मी स्ट्रेंथ वर्कआउट केला आणि नुकताच घरी परतलो. थोडी डोकेदुखी आहे. बिर्याणी आणि झोपनं आता काम होईल ठीक. म्हणून, तुम्हा सर्वांना खूप प्रेम. या बातमीनं अस्वस्थ होऊ नका.'
Telugu actor Vijay Deverakonda's car collided with another vehicle in Undavalli, Jogulamba Gadwal district, while he was en route from Puttaparthi to Hyderabad today. His car sustained damage on the left side. However, there were no casualties in the accident.
— ANI (@ANI) October 6, 2025
According to… pic.twitter.com/pV1IAis35S
Actor Vijay Deverakonda narrowly escaped injury after his Lexus was involved in a collision with a Bolero near Undavalli in Jogulamba Gadwala. He was reportedly en route to Puttaparthi when the Bolero made a sudden turn, leading to the accident. Vijay was inside the car but… pic.twitter.com/LlStHt9oRX
— SIIMA (@siima) October 6, 2025
VIDEO | Hyderabad: Actor Vijay Deverakonda’s car was involved in a minor accident in Jogulamba Gadwal district, Telangana. The actor was unharmed.
— Press Trust of India (@PTI_News) October 6, 2025
The incident occurred while he was returning to Hyderabad from Puttaparthi in neighboring Andhra Pradesh, when another vehicle… pic.twitter.com/vSTKKIUkNv
All is well ❤️
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) October 6, 2025
Car took a hit, but we are all fine. Went and did a strength workout as well and just got back home.
My head hurts but nothing a biryani and sleep will not fix. So biggest hugs and my love to all of you. Don’t let the news stress you 🤗❤️
विजय देवरकोंडाबद्दल : दरम्यान अभिनेत्याची लेक्सस कारला किरकोळ नुकसान झालं आहे. या कारचा व्हिडिओ देखील ऑनलाइन समोर आला, जो पुष्टी करतो की टक्कर गंभीर नव्हती. विजयच्या अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या साखरपुड्याच्या वृत्तानंतर काही दिवसांतच हा अपघात झाला आहे. दोघांनीही या बातमीला सार्वजनिकरित्या दुजोरा दिला नसला तरी, अहवालांनुसार त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये एका खाजगी समारंभात साखरपुडा केला. आता हे जोडपे फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करण्याची योजना आखत आहेत. दरम्यान कामाच्या बाबतीत, विजयच्या हातात अनेक चित्रपट आहेत, ज्यात 'राउडी जनार्दनन' आणि राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित ' VD14' यांचा समावेश आहे. तसेच विजय शेवटी गौतम तिन्नानुरी दिग्दर्शित' किंगडम'मध्ये दिसला होता.
हेही वाचा :

