मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. या विशेष प्रसंगी आलियानं सोशल मीडियावर अभिनेता पती रणबीरबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया ही रणबीरच्या खूप जवळ असल्याची दिसत आहेत. आलियानं हा फोटो शेअर केल्यानंतर, तिच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी या जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. तिचा हा न पाहिलेला फोटो आता अनेकांना आवडत आहेत. आलिया आणि रणबीरच्या या फोटोला 19 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
सासू आणि वहिनींनी दिल्या शुभेच्छा : 14 एप्रिलच्या रात्री, आलिया भट्टनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'होम, ऑलवेज, हॅपी 3.' या जोडप्याच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. आलियाच्या या पोस्टवर नणंद आणि अभिनेत्री करीना कपूर खाननं लिहिलं, 'द बेस्ट पीप्स.' आलियाच्या सासू नीतू कपूर यांनी या पोस्टवर रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत. आलियाची आई सोनी राजदान यांनी रेड हार्टच्या इमोजीसह लिहिलं, 'अरे... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.' याशिवाय चाहत्यांनी देखील या जोडप्याववर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
'या' स्टार्सनीही दिल्या शुभेच्छा : आलिया भट्ट आणि रणबीर यांना झोया अख्तर, रिया कपूर, शिबानी दांडेकर, सबा पतौडी खान, गुनीत मोंगा, रणवीर सिंग आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह अनेक स्टार्सनी या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान रणबीर आणि आलियाचं लग्न 14 एप्रिल 2022 रोजी झालं. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये या जोडप्यानं त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. आलियानं 6 नोव्हेंबर रोजी राहा कपूर नावाच्या मुलीला जन्म दिला. यावर्षी राहा कपूर तीन वर्षांची होणार आहे. दरम्यान या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हे 'लव्ह अॅन्ड वॉर' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेता विकी कौशल दिसणार आहे.
हेही वाचा :