ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला' चित्रपटाचं शूटिंग समाप्त, अभिनेत्यानं शेअर केला व्हिडिओ...

अक्षय कुमारनं 'भूत बंगला' चित्रपटातील एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आता या चित्रपटाचं शूटिंग समाप्त झालं आहे.

Akshay kumar
अक्षय कुमार (अक्षय कुमार ('भूत बंगला' (पोस्टर))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : May 18, 2025 at 5:25 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं त्याच्या 'भूत बंगला' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. हा चित्रपट अक्षयसाठी विशेष असणार आहे. अक्षयच्या मागील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विशेष काही कामगिरी केली नाही. चित्रपट सतत अपयशी ठरत असताना या अभिनेत्याला 'भूत बंगला' मिळाला. आता पुन्हा एकदा खिलाडी कुमार हॉरर कॉमेडीद्वारे प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर हसविण्यासाठी येत आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारबरोबर वामिका गब्बी देखील दिसणार आहे. 'भूत बंगला' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अक्षयनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

अक्षय कुमारनं 'भूत बंगला' चित्रपटामधील व्हिडिओ केला शेअर : व्हिडिओमध्ये, अक्षय वामिका गब्बीबरोबर चित्रपटाचं शूट करताना दिसत आहे. पार्श्वभूमीत एक धबधबा वाहत आहे. या चित्रपटामधील हा एक खास सीन असणार आहे. आता ही पोस्ट शेअर करताना अक्षयनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'भूत बंगला'चं शूटिंग संपलं आहे, हा माझा मॅडकॅपबरोबरचा ७वा चित्रपट होता. प्रियदर्शन दिग्दर्शित, एकता कपूर निर्माती आहे आणि वामिका गब्बीबरोबरचा हा पहिला आहे, आशा आहे की शेवटचा नाही, जादूचा प्रवास. वेडेपणा, जादू आणि आठवणींसाठी आभारी आहे.' या व्हिडिओवर आता अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण अक्षयचं कौतुक करत, त्याच्या आगामी चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत.

अक्षय कुमारचं वर्कफ्रंट : 'भूत बंगला' चित्रपटाचे बहुतेक शूटिंग हैदराबादमध्ये झाले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केलं आहे. हा भयपट खूप मनोरंजक असणार, असं सध्या दिसत आहे. 'भूत बंगला' चित्रपटात अक्षय कुमार आणि वामिका गब्बी व्यतिरिक्त परेश रावल, राजपाल यादव, तब्बू, असरानी सारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग देशातील वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहेत. हा हॉरर-कॉमेडी चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. तसेच अक्षयच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर तो पुढं 'हेरा फेरी ३' , 'वेलकम टू द जंगल'आणि 'हाउसफुल 5'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. समुद्री क्रूझवरील मृत्यूचा खेळ, अक्षय कुमार स्टारर किलर कॉमेडी 'हाऊसफुल ५'चा टीझर प्रदर्शित...
  2. अक्षय कुमार स्टारर कोर्टरूम ड्रामा 'केसरी चॅप्टर २'नं रिलीजच्या सहाव्या दिवशी केली 'इतकी' कमाई...
  3. 'केसरी चॅप्टर २' पायरेटेडचा बळी, अक्षय कुमारचा कोर्टरूम ड्रामा थिएटरमध्ये रिलीज होण्याच्या काही तास आधी ऑनलाइन लीक