मुंबई - 'हाऊसफुल ५' शुक्रवारी ६ जून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख अभिनीत या चित्रपटाचे दोन व्हर्जन आहेत, पहिले- 'हाऊसफुल ५ए' आणि दुसरे- 'हाऊसफुल ५बी'. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर खूप चांगला कमाई करत आहे. अलीकडेच अक्षय कुमार वांद्रे येथील एका थिएटरमध्ये पोहोचला आणि 'हाऊसफुल' स्टाईलमध्ये, त्यानं चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्याच्या कॅमेऱ्यात टिपल्या. अक्षय कुमार त्याच्या अनोख्या प्रमोशनल स्टंटमुळे पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 'हाऊसफुल ५' या त्याच्या नवीन कॉमेडी थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांची प्रतिक्रिया थेट जाणून घेण्यासाठी, खिलाडी कुमार स्वतः 'हाऊसफुल' स्टाईलमध्ये प्रेक्षकांमध्ये पोहोचला. अक्षयनं त्याच्या चित्रपटाचा प्रसिद्ध किलर मास्क घातला आणि कोणाचेही लक्ष न जाता थिएटरबाहेर माइक घेऊन फिरत राहिला.
'हाऊसफुल ५'चा घेतला अक्षय कुमारनं आढावा : ८ जून रोजी अक्षय कुमारनं त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो थिएटरबाहेर किलर मास्क घालून हातात माइक घेऊन 'हाऊसफुल ५'च्या पुनरावलोकनाबद्दल विचारत होता. क्लिप शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'अगदी असेच, मी किलर मास्क घालण्याचा निर्णय घेतला. आज मी वांद्रे येथे 'हाऊसफुल ५'चा शो पाहून बाहेर पडणाऱ्या लोकांची मुलाखत घेतली. मी शेवटी पकडला जाणार होतो, पण त्याआधीच पळून गेलो. छान अनुभव होता.' व्हिडिओमध्ये, अक्षय कुमार निळ्या रंगाच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये असल्याचा दिसत आहे. यावर त्यानं किलर मास्क घातलं आहे. एका युट्यूबरप्रमाणे, तो हातात माइक घेऊन थिएटरबाहेर येणाऱ्या लोकांना चित्रपटाबद्दल विचारत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयनं काही प्रेक्षकांना विचारे "तुम्हाला चित्रपट कसा वाटला?" अनेक उत्साहित मुलांनी आणि त्याच्या चाहत्यांनी चित्रपटाबद्दल आपले मत मांडले.
'हाऊसफुल ५'चं केलं चाहत्यांनी कौतुक : यामधील काही प्रेक्षकांनी म्हटलं, "चित्रपट खूप सुंदर आहे." यादरम्यान अक्षयनं लोकांना विचारलं की, "त्यांना चित्रपटात कोण आवडले?" यावर अनेक प्रेक्षकांनी नाना पाटेकर आणि जॉनी लिव्हर यांची नाव घेतली. काहींनी सर्व पात्रांचे कौतुक केलं. अक्षयनं एका लहान मुलाला विचारलं की "त्याला चित्रपट कसा वाटला." मुलानं आनंदानं म्हटलं, "खूप चांगला आहे." यादरम्यान, काही लोक कॅमेऱ्यापासून दूर पळताना दिसले. शनिवारी रात्री (७ जून) अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खान आणि 'हाऊसफुल ५'चे दिग्दर्शक तरुण मनसुखानी एका शो दरम्यान मुंबईतील एका थिएटरमध्ये गेले आणि प्रेक्षकांशी संवाद साधला. 'हाऊसफुल ५'च्या टीमला अचानक थिएटरमध्ये पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते.
'हाऊसफुल ५' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन : अक्षय कुमार, रितेश देशमुख यांच्या कॉमेडी थ्रिलर 'हाऊसफुल ५'नं दोन दिवसांत ५० कोटींचा आकडा ओलांडला आहे. सॅकनिल्कच्या मते, 'हाऊसफुल ५'नं पहिल्या दिवशी २४ कोटी रुपये कमावले होते. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता 'हाऊसफुल ५'नं दोन दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण ५४ कोटी रुपये कमावले आहेत. 'हाऊसफुल ५' स्टार कास्ट चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान, संजय दत्त, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, दिनो मोरिया, जॉनी लिव्हर, चंकी पांडे, चित्रांगदा सिंग, रणजीत, निकितिन धीर, सोनम बाजवा आणि सौंदर्या शर्मा सारख्या कलाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा :