मुंबई - अभिनेत्री जया बच्चनला तिच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखले जाते. अनेकदा लोक तिची प्रशंसा देखील करत असतात. काही दिवसांपूर्वी जयानं अक्षय कुमारच्या 2017मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाबद्दल एक विधान केलं होतं. हे विधान आता त्याचं सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. आता या प्रकरणावर अक्षय कुमारचं उत्तरही समोर आलंय. खिलाडी कुमारनं यासंदर्भात काय म्हटलं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जया बच्चननं अक्षय कुमारच्या चित्रपटाबद्दल केलं भाष्य : 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटावर जया बच्चननं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं, 'अशा नावाचा चित्रपट कधीही पाहणार नाही. अशा नावांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर निश्चितच फ्लॉप होतील. चित्रपटाच्या शीर्षकाची खिल्ली उडवताना त्यांनी पुढं म्हटलं होतं, 'चित्रपटाचे शीर्षक बघा, मी अशा नावांचे चित्रपट कधीच पाहणार नाही, हे नाव आहे का?' हे खरंच चित्रपटाचे नाव आहे का? अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटावर टीका केल्यानंतर अनेकजण जयाला ट्रोल करत आहे.
अक्षयनं दिली प्रतिक्रिया : अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'केसरी' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यावेळी त्याला जया बच्चन केलेल्या विधानाबद्दल विचारण्यात आलं की, जेव्हा तुम्ही असे चित्रपट करता आणि अशा निवडींसाठी तुम्हाला टीका होते, तेव्हा तुम्ही ते कसे घेता? यावर उत्तर देताना अक्षय म्हटलं, 'टीका, मला वाटत नाही की अशा चित्रपटांवर कोणी टीका केली असेल. अशा चित्रपटांवर टीका करणारा मूर्खच असेल. मी 'पॅडमॅन', टॉयलेट एक प्रेम कथा', 'एअरलिफ्ट' आणि 'केसरी' हे चित्रपट बनवले आहेत, तर तुम्हीच सांगा यापैकी कोणता चित्रपट वाईट आहे. यावर त्यांना सांगण्यात आले की जया बच्चन यांनी तुमच्या चित्रपटावर टीका केली आहे. यावर अक्षय म्हटलं, 'जर त्यांनी असं म्हटलं असेल तर ते बरोबर असेल, जर 'टॉयलेट एक प्रेम कथा'सारखा चित्रपट त्याला योग्य वाटत नसेल, तर त्यात काहीतरी चूक असेल.' दरम्यान यावेळी त्याच्याबरोबर करण जोहर आणि अनन्या पांडे देखील होते. 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटानं 216 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. यानंतर 'पॅडमॅन' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 191 कोटीचं कलेक्शन केलं होतं.
हेही वाचा :
- अक्षय कुमार स्टारर 'केसरी चॅप्टर 2 द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग'चा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ
- केसरी २ चा फर्स्ट लूक : वकीलाच्या भूमिकेत अक्षय कुमार आणि माधवन, अनन्या पांडेही करणार युक्तिवाद
- अक्षय कुमार स्टारर 'केसरी चॅप्टर 2 - द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग'चा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ...