मुंबई : उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपटात शंतनू गुप्ता यांच्या 'द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर' या पुस्तकावर आधारित आहे. आता 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी'च्या पहिल्या झलकमध्ये अभिनेता अनंत जोशी योगी आदित्यनाथच्या भूमिकेत दिसत आहेत. जो लोकांची सेवा करण्यासाठी जगाचा त्याग करतो. पार्श्वभूमीत परेश रावलचा आवाज ऐकू येतो, "त्याला काहीही नको होते, सर्वांना तो हवा होता. जनतेनं त्यांना सरकार बनवलं."
'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' चित्रपटाची स्टार कास्ट : 'महाराणी 2' फेम रवींद्र गौतम दिग्दर्शित 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या चित्रपटात दिनेश लाल यादव, पवन मल्होत्रा, राजेश खट्टर, अजय मेंगी, गरिमा विक्रांत सिंग आणि सरवर आहुजा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे शीर्षक योगी आदित्यनाथ यांच्या जन्माच्या नावावरून, अजय सिंग बिष्टवर प्रेरित आहे. 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' चित्रपट 2025मध्ये हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटाला संगीत मीत ब्रदर्स यांनी दिलं आहे.
दिग्दर्शकानं काय म्हटलं : चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक रवींद्र गौतम यांनी म्हटलं "आमचा चित्रपट आपल्या देशातील तरुणांसाठी अविश्वसनीयपणे प्रेरणादायी असेल. उत्तराखंडमधील एका दुर्गम खेड्यातील एका साध्या मध्यमवर्गीय मुलाचे जीवन दाखवेल, जो भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या राज्याचा मुख्यमंत्री बनतो." योगी आदित्यनाथ 2017 पासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांनी सर्वाधिक काळ (8 वर्षे) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांचे बालपणीचं नाव अजय मोहन सिंग बिष्ट होतं. या चित्रपटाचं शीर्षक त्यांच्या नावावरून ठेवलं गेलं आहे.