ETV Bharat / entertainment

अजय देवगण काजोलबरोबरचा त्याचा हनिमून मध्येच सोडून गेला, अभिनेत्रीनं सांगितली संपूर्ण कहाणी... - AJAY DEVGN BIRTHDAY

अजय देवगण हा आज 2 एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या हनिमूनबद्दल किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Ajay Devgn and kajol
अजय देवगन-काजोल (अजय देवगन-काजोल (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 2, 2025 at 11:45 AM IST

1 Min Read

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आज 2 एप्रिल रोजी त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. अजयनं बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वयाच्या 56व्या वर्षी देखील तो चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय आहे. अलीकडेच अजय देवगण हा रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटामध्ये दिसला होता. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हिट झाला होता. दरम्यान आजचा दिवस अजयसाठी खूप विशेष आहे. अजयच्या वाढदिवशी त्याच्या वैयक्तिक आयुष्याच्या संबंधित एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अजय देवगण आणि काजोलचा हनिमून : काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक आहेत. 'हलचल'च्या सेटवर काजोल आणि अजय यांच्यात चांगली मैत्री झाली होती. यानंतर या दोघांची मैत्री प्रेमात बदलली. या दोघांनी 1999मध्ये लग्न केलं. काजोलनं लग्नासाठी अजयसमोर एक अट ठेवली होती. जे अजय पूर्ण करू शकला नाही. खरं तर, एका मुलाखतीत काजोलनं स्वतः खुलासा केला होता की, तिनं लग्नासाठी अजयसमोर एक अट ठेवली होती की, लग्नानंतर ती 2 महिन्यांच्या हनिमूनवर जातील. मात्र अजय हनिमून मध्येच सोडून परत आला होता. काजोलनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'हनिमून दरम्यान अजय देवगणला घराची आठवण येऊ लागली आणि तो घरी जाण्याचा आग्रह करू लागला. त्यानं आजारी असल्याचं निमित्त केलं आणि आम्ही दोघेही घरी परतलो.' लग्नानंतर अजयनं आपलं वचन पूर्ण करू शकला नाही, तो हनिमून अर्ध्यावर सोडून गेला होता.

अजय देवगणचं वर्कफ्रंट : लग्नाआधीच अजयनं काजोलला वचन दिलं होतं की, त्याचं लग्न झाले तर तो 2 महिन्यांसाठी हनिमूनला जाईल. अजय आणि काजोल त्यांच्या हनिमूनसाठी ऑस्ट्रेलिया, लास वेगास, लॉस एंजेलिस आणि ग्रीससारख्या ठिकाणी गेले होते. मात्र काजोल आणि अजय दोघेही फक्त 40 दिवसात परत घरी आले होते. दरम्यान अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'रेड 2' या चित्रपटामध्ये रितेश देशमुखबरोबर दिसणार आहे. याशिवाय तो 'दे दे प्यार दे 2', 'गोलमाल 5' आणि 'सन्स ऑफ सरदार 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अजय देवगण आणि रितेश देशमुख अभिनीत 'रेड 2'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ
  2. अजय देवगण - रितेश देशमुख अभिनीत 'रेड 2'मधील पोस्टर रिलीज, वाचा सविस्तर...
  3. पाहा, झुंझार योद्धा 'आझाद'चा भव्य ट्रेलर, साहसी चित्रपटाची प्रतीक्षा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.