मुंबई : विनोदी चित्रपट फ्रँचायझी 'धमाल'च्या चौथ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'रेड 2'नंतर, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनं त्याच्या पुढील चित्रपट 'धमाल 4'चं शूटिंग सुरू केलंय. अजय देवगणनं चित्रपटाच्या वेळापत्रक आणि स्टारकास्टबद्दल माहिती देणारे काही फोटो शेअर केले आहेत. आता 'धमाल 4'मध्ये काही नवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. दरम्यान अजय देवगणचा आगामी 'रेड 2' चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर अनेकांना आवडला होता. दरम्यान अजय देवगणनं आज, 10 एप्रिल रोजी त्याच्या आगामी 'धमाल 4' चित्रपटाची अधिकृत घोषणा करून चाहत्यांना एक भेट दिली आहे.
'धमाल 4'ची झाली घोषणा : अजय देवगणनं त्याच्या इंस्टाग्रामवर 'धमाल 4'च्या स्टारकास्ट आणि शूटिंग शेड्यूलबद्दल माहिती शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वेडेपणा परत आला आहे.' धमाल 4'ची सुरुवात धमाकेदार झाली. मालशेज घाटचे वेळापत्रक पूर्ण, मुंबईचे वेळापत्रक सुरू. चला हास्याचा दंगा सुरू करूया.' 'धमाल 4'चं दिग्दर्शन इंद्र कुमार करणार आहेत. देवगण फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, 'धमाल 4'मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यासारख्या कलाकारांची टीम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
'धमाल' फ्रँचायझीबद्दल : दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं, "प्रेक्षकांना चित्रपट खूप आवडेल." हा चित्रपट 2025च्या अखेरीस मोठ्या पडद्यावर येण्याची अपेक्षा आहे. आता या संदर्भात अधिकृत पुष्टीची वाट पाहिली जात आहे. 2007मध्ये प्रदर्शित झालेला 'धमाल' बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. या चित्रपटामधील मजेदार दृश्य आणि कहाणीबद्दल खूप प्रशंसा झाली होती. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. पहिल्या भागाच्या यशानंतर, निर्मात्यांनी 2011मध्ये 'डबल धमाल' आणि 2019मध्ये 'टोटल धमाल' बनवले आणि या दोन्ही भागांनी प्रेक्षकांना खूप हसवले. आता आपल्याला 'धमाल 4'मध्ये कोणती नवीन गोष्ट पाहायला मिळेल, हे पाहाणं लक्षणीय असणार आहे.
हेही वाचा :