मुंबई : अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतीक्षित 'रेड 2' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची नुकतीच रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट 1 मे रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. आता या चित्रपटामधील एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख असल्याचं दिसत आहे. 'रेड 2' चित्रपटामध्ये रितेश एका राजनेत्याची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटामधील हे पोस्टर अनेकांना आवडत आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये रितेश जनताबरोबर आहे. याशिवाय या पोस्टरमध्ये त्याच्या पार्टीचा ध्वज देखील असल्याचं दिसत आहे. या ध्वजमध्ये चप्पल चिन्ह आहे.
'रेड 2'मध्ये रितेश देशमुखची विशेष भूमिका : राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' चित्रपटामध्ये अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड'चा हा चित्रपट जबरदस्त होता. दरम्यान 'रेड 2'ची कहाणी आयआरएस अधिकारी अमय पटनायक यांच्यावर आधारित आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या वास्तविक आयकर छापे या चित्रपटात दाखविण्यात येतील. 'रेड 2'ची चित्रपटाची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी एप्रिल 2020मध्ये केली होती. या चित्रपटाचं प्री- प्रॉडक्शन ऑगस्ट 2022पासून सुरू झाले होते. 'रेड 2' चित्रपटामध्ये रितेश देशमुख दादा भाई नावाच्या खलनायकाची भूमिका करेल. या चित्रपटात इलियाना डिक्रूझची जागा वाणी कपूर असेल.
अजय देवगणनं शेअर केलं पोस्टर : रिपोर्टनुसार या चित्रपटाचा टीझर 30 मार्च रोजी सलमान खानच्या 'सिकंदर'बरोबर थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय 'रेड 2' चित्रपट चित्रपटगृहांमधून गेल्यावर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. दरम्यान अजय देवगणनं चित्रपटामधील पोस्टर शेअर करताना पोस्टमध्ये लिहिलं, 'दादाभाई कायद्यावर अवलंबून नाहीत, ते कायद्याचे गुरु आहेत! 'रेड 2' 1 मे 2025 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.' आता अजयनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन, त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत. तसेच अजयच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, तो पुढं 'सन ऑफ सरदार 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर मृणाल ठाकूर आणि संजय दत्त हे देखील कलाकर असणार आहेत.
हेही वाचा :