दहशतवादी हल्ल्यानंतर अरिजीत सिंगचा चेन्नईतील कॉन्सर्ट रद्द, अनिरुद्धनंही बेंगळुरूतील कार्यक्रमही पुढं ढकलला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग आणि संगीतकार अनिरुद्ध यांच्या म्यूझिक इव्हेन्टमध्ये बदल करण्यात आले आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : April 24, 2025 at 8:06 PM IST
मुंबई - जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर, गायक अरिजीत सिंग आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंद्र यांनी त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टबाबत निर्णय घेतला आहे. अरिजीत सिंगनं चेन्नईतील त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यानं त्याचा बेंगळुरूतील कॉन्सर्ट पुढे ढकलला आहे. दोघांनीही सोशल मीडियावरुन ही गोष्ट चाहत्यांना कळवली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अरिजीत सिंगनं चेन्नईतील त्याचा आगामी लाईव्ह कॉन्सर्ट शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कठीण काळात बळी पडलेल्यांसाठी श्रद्धांजली म्हणून हे पाऊल त्यानं उचललंय. अरिजीतनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चेन्नईतील कॉन्स्र्टबद्दल अपडेट शेअर केली आहे. अरिजीतनं लिहिले आहे की, "अलीकडील दुःखद घटना लक्षात घेऊन, आयोजक आणि कलाकारांनी एकत्रितपणे रविवारी २७ एप्रिल रोजी चेन्नईत होणारा आगामी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व तिकीटधारकांना त्यांचा पूर्ण परतावा मिळेल. तुमचे काही प्रश्न असल्यास, events@district.in वर लिहा. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद."
संगीतकार अनिरुद्ध रविचंदरचा बेंगळुरूतील कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आला - संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी आज २४ एप्रिल रोजी जाहीर केलं की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर त्याच्या बेंगळुरूतील कार्यक्रमाची तिकिटं विक्री नवीन तारखेपर्यंत पुढं ढकलण्यात आली आहे. अनिरुद्धन यानं त्याच्या एक्स सोशल मीडियावर त्याच्या हुकुम वर्ल्ड टूरबद्दलटी अपडेट शेअर करताना लिहिलं की, "पहलगाममध्ये घडलेल्या दुःखद घटनांनी आपल्या सर्वांना हादरवून टाकलं आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना आणि प्रार्थना. देशातील सध्याची परिस्थिती पाहता, आम्ही हुकुम वर्ल्ड टूर बेंगळुरू शोची तिकिट विक्री पुढे ढकलत आहोत. ही तिकीट विक्री आज २४ एप्रिलपासून सुरू होणार होती. आता बेंगळुरूच्या दुसऱ्या शोची नवीन तिकिट विक्रीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल."
The tragic events in Pahalgam have deeply shaken us all.
— Anirudh Ravichander (@anirudhofficial) April 24, 2025
Our heartfelt prayers and deepest condolences go out to the victims and their families.@KvnProductions @TheRoute @BrandAvatar @lifeindistrict pic.twitter.com/ltUhQij1nF
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन मैदानावर पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप लोकांवर गोळीबार केला आणि यात किमान २६ लोक मारले गेले आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवाद्यांच्या कृतीचा जगभरातून निषेध होत आहे आणि बळी गेलेल्या पर्यटकांसाठी संवेदना व्यक्त होत आहेत.
हेही वाचा -
सलीम मर्चंटनं दहशतवादी हल्ल्याबद्दल केलं दु:ख व्यक्त, व्हिडिओ व्हायरल...
फवाद खान आणि हानिया आमिरसह पाकिस्तानी सेलिब्रिटींकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध
'इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’मधून दिसणार भावनांची लाट आणि संघर्षाची वादळं

