ETV Bharat / entertainment

अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांना रोमँटिक नसल्याचं म्हटल्यानंतर ट्रोलर्सनी घेतलं निशाण्यावर - Amrutas video viral

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या देवेंद्र फडणवीस हे रोमँटिक नसल्याचं म्हणताना दिसत आहेत. यानंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2024, 12:58 PM IST

Amruta Fadnavis
अमृता फडणवीस (instagram)

मुंबई Amruta Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या प्रचंड चर्चेत आहेत. अमृता यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली, ही मुलाखत आता खूप चर्चेत आली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल एक विधान केलं आहे. 'होऊ दे चर्चा...कार्यक्रम आहे घरचा!' या शोमध्ये सोनाली कुलकर्णीनं घेतलेली मुलाखत आता सध्या सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनला आहे. या मुलखतीदरम्यान सोनाली अमृता यांना गाणं गाण्यास देखील लावते. आता सोशल मीडियावर सोनालीनं या कार्यक्रमामधील काही व्हिडिओ क्लिप चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.

अमृता फडणवीस यांचा व्हिडिओ व्हायरल : या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांना सध्या ट्रोल केलं जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अमृता यांनी म्हटलं, "धरण उशाला कोरड घशाला असं म्हटलं जातं, देवेंद्रजी माझ्यासमोर येतात आणि जातात. रोज दिसतात पण त्यांचा हात धरुन मजा मस्ती करताच येत नाही. धरण उशाला असतं आणि कोरड घशाला. यानंतर सोनाली विचारते की, "देवेंद्रजी रोमँटिक आहेत का?" त्यावर अमृता फडणवीस या म्हणतात, "नाही देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहे, त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना राजकारण सोडून काहीही कळतं नाही."

अमृता फडणवीस या पुन्हा झाल्या ट्रोल : आता या भाष्याबाबत एका यूजरनं लिहिलं, "मामी ओव्हर रोमँटिक आहेत." दुसऱ्या एकानं लिहिलं, "विवेक बुध्दी वापरून बोला अमृता मामी." आणखी एकानं लिहिलं, "मामी मामानं हे जर ऐकलं तर हार्ट अटॅक येईल." अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. अमृता फडणवीस यांना गाणं गायला खूप आवडते. त्यामुळे त्या अनेक कार्यक्रमादरम्यान गाणं गात असतात, मात्र त्यांना यूजर्स सोशल मीडियावर खूप ट्रोल करतात. दरम्यान ट्रोलिंगबाबत बोलताना अमृता फडणवीस यांनी म्हटलं "माझा ठाम विश्वास आहे की लोक मला ट्रोल करत नाहीत. मी अनेकदा आयडी पाहिला आहे, यात फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पेड ट्रोलर्स असतात, आता हे माझ्या लक्षात आलं आहे. याशिवाय देवेंद्र यांना मा. मु. असं म्हटलं गेलं होतं. यानंतर माजी मुख्यमंत्री यांनी मला मामी म्हणायचे. या गोष्टीचा मला फरक पडत नाही, उलट मला गंमत वाटते. यानंतर मला असं वाटते की या लोकांकडे किती वेळ असतो. आता सोशल मीडियावर सध्या अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यबद्दल यूजर्स चर्चा करत आहेत.

हेही वाचा :

  1. आदिवासी कुपोषित महिलांच्या जीवनात बदल घडवणार, अमृता फडणवीस यांचा निर्धार - Amruta Fadnavis
  2. पर्यावरणपूरक सण साजरा करूया, अमृता फडणवीस यांचं आवाहन - Amruta fadnavis
  3. Amruta Fadnavis On Nagpur Flood: नागपूरमधील परिस्थितीला कोण जबाबदार? पहा काय म्हणाल्या अमृता फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.