शिर्डी - दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'पुष्पा 2' चित्रपटातील 'किसिक' (Kiss Ik) या गाण्यामुळे चर्चेत आलेली श्रीलीला हिने आज आपल्या आई स्वर्णलता यांच्याबरोबर शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. येत्या दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या आपल्या आगामी 'आशिकी 3' या चित्रपटाच्या यशासाठीही तिनं साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे.
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीलानं घेतलं साईबाबाचं दर्शन : अभिनेत्री श्रीलीला आणि तिची आई स्वर्णलता यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर त्या खूप खुश झाल्या. त्याच बरोबर साईबाबांची सायंकाळी होणाऱ्या धुपारती आणि पहाटेच्या काकड आरती उपस्थिती त्यांनी लगावली आहे. साई दर्शनानंतर संस्थानच्या वतीनं अभिनेत्री श्रीलीला हिचा शाल आणि साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी साईबाबांच्या द्वारकामाई आणि गुरुस्थान मंदिरातही जाऊन श्रीलीला हिनं मनोभावे दर्शन घेतलं आहे.



श्रीलीलानं व्यक्त केल्या भावना : साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना श्रीलीला म्हणाली, "आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन खूप समाधान वाटलं. साईबाबाची धुपारती आणि काकड आरतीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा योग आल्यानं स्वतःला खूप भाग्यवान समजते. मी लहानपणापासून आईबरोबर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहे. मात्र आज सहा वर्षांनंतर साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा योग आला आहे. तसेच माझा आगामी येणाऱ्या 'आशिकी 3' हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या यशासाठीही आज साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे."
श्रीलीलानं चाहत्यांबरोबर काढले फोटो : अभिनेत्री श्रीलीला ही दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 'पुष्पा 2'मधील तिचं 'किसिक' (Kiss Ik) हे गाणं विशेष गाजल्यानं ती प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरात उपस्थिती असलेल्या भाविकांना श्रीलीला दिसल्यानं अनेकांनी तिच्याबरोबर सेल्फी आणि ऑटोग्राफ घेतला. अभिनयाबरोबरच तिच्या साधेपणामुळे तिचा चाहतावर्ग खूप मोठा वाढला आहे. दरम्यान अनेक चाहते तिचा आगामी चित्रपट 'आशिकी 3'ची वाट पाहात आहेत. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर कार्तिक आर्यन दिसणार आहे.
हेही वाचा :