मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांचा नातू इब्राहिम अली खानचा बहुचर्चित पहिला चित्रपट 'नादानियां'बद्दल आपलं मत व्यक्त केलंय. इब्राहिमचा हा चित्रपट हा 7 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. शर्मिला टागोर यांनी नेहमीच नातू इब्राहिम आणि सारा अली खान यांच्या कामाचं कौतुक केलंय, मात्र 'नादानियां' हा चित्रपट चांगला नव्हता असं म्हणणाऱ्यांशी ती सहमत आहे. 'नादानियां' चित्रपटासाठी इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं होतं. 'नादानियां' चित्रपटामध्ये त्यांनी प्रमुख भूमिकेत काम केलंय. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर जुगल हंसराज, दिया मिर्झा, महिमा चौधरी आणि इतर कलाकार झळकले आहेत.
शर्मिला टागोरनं इब्राहिमचा चित्रपट चांगला नसल्याचं सांगितलं : आता अलीकडच्याच एका मुलाखतीत, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि इब्राहिमची आजी यांनी कबूल केलं की, "इब्राहिम पडद्यावर चांगला दिसत होता, मात्र हा चित्रपट चांगला नव्हता. या गोष्टींवर उघडपणे चर्चा करू नये, पण शेवटी, चित्रपट चांगला असायला हवा, मात्र असं काही झालं नाही." 'नादानियां' हा इब्राहिमचा पहिला चित्रपट होता, जो फारसा यशस्वी झाला नाही, आता इब्राहिम त्याच्या कुटुंबाचा वारसा पुढं नेईल की नाही, हे येणारा काळच सांगेल. 'नादानियां' चित्रपटात श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरनं इब्राहिमबरोबर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे.
शर्मिला टागोर यांच्याबद्दल : दरम्यान खुशी कपूरनं २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द आर्जीज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. याशिवाय २०२५ मध्ये फेब्रुवारीमध्ये तिचा 'लव्हयापा' हा चित्रपटही प्रदर्शित झाला, यामध्ये तिच्याबरोबर जुनैद खान हा दिसला होता. तसेच शर्मिला टागोरबद्दल बोलायचं झालं तर, या ज्येष्ठ अभिनेत्रीनं १९५९मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यजित रे यांच्या 'अपुर संसार' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीचा प्रवास सुरू केला होता. शर्मिला टागोर त्यांचा शेवटचा 'पुराटन' हा बंगाली चित्रपट होता.
हेही वाचा :