ETV Bharat / entertainment

वाढदिवसाच्या दिवशी शबाना आझमी यांनी पती जावेद अख्तरसह केला डान्स...

बॉलिवूड दिग्गज लेखक जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोघेही सुंदर डान्स करताना दिसत आहे.

Shabana azmi and javed akhtar
शबाना आझमी आणि जावेद अख्तर (Shabana azmi and javed akhtar (Etv Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : September 19, 2025 at 10:45 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - बॉलिवूड दिग्गज लेखक जावेद अख्तर यांनी पत्नीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमीनं वाढदिवसाच्या पार्टीत पाहुण्यांसमोर सुंदर डान्स करून त्याचं मनोरंजन केलं. शबाना यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कोनी फ्रान्सिसच्या 'प्रीटी लिटिल बेबी' या सुंदर गाण्यावर डान्स केला. चमकदार लाल बॉर्डर आणि ब्रोचसह फ्लॉवर मरून आउटफिटमध्ये शबाना या सुंदर दिसत होत्या. तसेच जावेद अख्तर यांनी लाल कुर्ता आणि काळ्या नेहरू जॅकेट घातलं होतं. या लूकमध्ये ते देखणे दिसत होते.

शबाना आझमी यांचा वाढदिवस : या दोघांचा डान्स पाहून तिथे उपस्थित असलेल्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजविल्या. दरम्यान हा व्हिडिओ फराह खाननं देखील तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तिनं लिहिलं, 'तुम्ही आता ७५ वर्षांच्या झाल्या आहात, वाढदिवसाच्या शुभेच्छा शबाना आझमी तुम्ही आणि जावेद अख्तर नेहमीत तरुण राहा.' दरम्यान वाढदिवसामधील हा व्हिडिओ करण जोहरनं शूट केला होता. या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित देखील उत्साहनं त्यांना पाहात थोडा डान्स करायला लागली होती.

उर्मिला मातोंडकरनं शेअर केली पोस्ट : दरम्यान व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की, रेखा आकर्षक सादरीकरणानं पूर्णपणे भारावून गेली. या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये फरहान अख्तर , शिबानी अख्तर, महीप कपूर, सोनू निगम, नीना गुप्ता आणि इतर स्टार्स देखील उपस्थित होते. तसेच उर्मिला मातोंडकरनं देखील शबाना आझमीसाठी एक सुंदर नोट लिहिलं आहे, यामध्ये तिनं 'मासून' १९८३च्या फोटोशूट दरम्यान झालेल्या पहिल्या भेटीती आठवण केली. तिनं यामध्ये लिहिलं, '१९८३मध्ये जानकी कुटीरचं ठिकाण, लहान, उत्सुक आणि चिंताग्रस्त 'मासूम'च्या फोटोशूटसाठी शबाना आझमींना पाहून मी खूपच चिंतेत आणि घाबरले होते आणि त्यानंतर प्रेम, आदर, कौतुक, शिक्षण, हास्य, वेडेपणा आणि इतर अनेक गोष्टींचे हे एक अपवादात्मक बंधन आहे. मी तुमचे आभार मानू शकेन अशा अनेक गोष्टी आहेत, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही मला सतत आठवण करून देता की 'सर्व आव्हानांसह, जीवन कसे पूर्ण जगायचे.' वाढदिवसाच्या शुभेच्छा राणी.' आता उर्मिलाची पोस्ट अनेकजण पसंत करून शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

  1. 'स्पिरिट'नंतर, दीपिका पदुकोण 'कल्की २८९८ एडी - २'मधून बाहेर, निर्मात्यांनी कारण केलं उघड...
  2. पाटणा उच्च न्यायालयात 'जॉली एलएलबी ३' प्रकरणाची सुनावणी, याचिकाकर्त्यानं चित्रपटावर केले गंभीर आरोप...
  3. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' स्क्रिनिंगमध्ये बॉलिवूड स्टारचा दबदबा...