मुंबई - दिग्गज अभिनेत्री जया बच्चन या आज 9 एप्रिल रोजी आपला 77वा वाढदिवस साजरा करत आहे. जया बच्चन यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 15व्या वर्षीपासून केली. त्यांनी सत्यजित रे यांच्या बंगाली चित्रपट 'महानगर'मध्ये काम करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांना खरी ओळख 'गुड्डी' (1971) या चित्रपटानं दिली. 1960 ते 1980च्या दशकापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. जया बच्चन यांनी पती अमिताभ बच्चनबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये 'जंजीर' , 'शोले', 'सिलसिला', 'एक नजर', 'बन्सी बिरजू', 'मिली', 'चुपके चुपके', 'गंगा देवी' आणि 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटांचा समावेश आहेत. दरम्यान एक काळ असा होता, जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या फ्लॉप चित्रपटांमुळे सर्व अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला, तेव्हा जया यांनी त्यांच्याबरोबर 'जंजीर' चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप गाजला होता. आज आम्ही जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या 5 चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्ही नक्की पाहायला पाहिजे.
1. गुड्डी (1971) : 'गुड्डी'मध्ये जया बच्चन यांनी चित्रपटांच्या ग्लॅमरमध्ये हरवलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. त्याचा निरागसता, खेळकरपणा आणि अभिनयातील साधेपणानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटानंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या.
2 . कोशिश (1972) : या चित्रपटात जया यांनी एका मूकबधिर महिलेची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये त्यांनी दमदार अभिनय केला आहे. अपंगत्वासोबत जगण्याचा सन्मान आणि संघर्ष 'कोशिश' चित्रपटामध्ये दाखविण्यात आलंय. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात भावनिक चित्रपटांपैकी एक मानला जातो.
3. अभिमान (1973) : या चित्रपटात, जया बच्चन यांनी एका गायिकेची भूमिका केली होती, जिची लोकप्रियता तिच्या पतीच्या स्वाभिमानाशी टक्कर घेते. या चित्रपटामधील त्यांचा अभिनय अनेकांना आवडला होता. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता.

4 . मिली (1975) : 'मिली' चित्रपटामध्ये, जयानं एका मुलीची भूमिका साकारली होती, जी तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदानं जगू इच्छिते. या चित्रपटामध्ये तिचं आयुष्य हे कमी असते. त्यांची ही भूमिका संवेदनशील, सकारात्मक आणि मनाला भिडणारी आहे. जया बच्चन यांचा हा चित्रपट देखील खूप गाजला होता.
5. चुपके चुपके (1975) : 'चुपके चुपके' या चित्रपटातून हे दिसून येते की, जया बच्चन फक्त गंभीर आणि संवेदनशील भूमिका व्यतिरिक्त कॉमेडी चित्रपटांमध्ये चांगला अभिनय करू शकतात. जया यांचा कॉमिक टायमिंग देखील उत्कृष्ट आहे. त्यांनी 'चुपके चुपके' या चित्रपटामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
जया बच्चन शेवटी 'या' चित्रपटात दिसल्या : जया बच्चन यांचे योगदान केवळ चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित नाही. त्यांनी 'शहंशाह' सारख्या चित्रपटांसाठी पटकथाही लिहिली आहे. याशिवाय त्या राजकारणातही सक्रिय आहे. जया बच्चन या सोशल मीडिया आपलं मत बिनधास्त मांडत असतात. जया बच्चन अखेर करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामध्ये दिसल्या होत्या. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे कलाकार दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.
हेही वाचा :
- काजोल आणि जया बच्चन यांचा दुर्गापूजेतील रंजक संवादचा व्हिडिओ व्हायरल
- राज्यसभेच्या सभापतींवर संतापल्या जया बच्चन, म्हणाल्या, "तुमचा टोन मान्य नाही..." - JAYA BACHCHAN ON JAGDEEP DHANKAR
- "मी जया अमिताभ बच्चन...", ऐकून सभापती मोठ्यानं हसले, जाणून घ्या सभागृहात नेमकं काय घडलं? - Jaya Bachchan in Rajya Sabha