ETV Bharat / entertainment

सारा अली खानचा गोव्यातील कथित बॉयफ्रेंडबरोबरचा व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर चर्चेला उधाण...

सारा अली खान आणि अर्जुन बाजवा यांच्या डेटिंगच्या अफवा आता सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

sara ali khan
सारा अली खान (सारा अली खान (एएनआय))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 28, 2025 at 1:02 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'स्काय फोर्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे फारसे कौतुक झाले नाही. तसेच सध्या साराच्या डेटिंगच्या अफवा देखील सोशल मीडियावर होत आहेत. सारानं अद्याप अधिकृतपणे ती रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केलेली नाही. आता साराचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्याबरोबर कथित बॉयफ्रेंड अर्जुन प्रताप बाजवा असल्याचं दिसत आहे. पंजाबमधील राजकारणी फतेह सिंग बाजवा यांचा मुलगा अर्जुनचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. फतेह सिंग बाजवा हे पंजाबमधील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी ते काँग्रेसचे आमदारही राहिले आहेत.

सारा अली खानचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा व्हिडिओ व्हायरल : समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सारा अली खान आणि अर्जुन बाजवा गोव्यात असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओत सारा अर्जुन बाजवाच्या जवळ येते आणि त्याच्या कमरेवर हात ठेवून काहीतरी सांगते. यानंतर ती तिथून निघून जाते. आता हा व्हिडिओ कधी शूट करण्यात आला, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच सारा आणि अर्जुनच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पांढऱ्या टी-शर्टसह डेनिम शॉर्ट्स घातला आहे. दुसरीकडे अर्जुननं पांढऱ्या टी-शर्ट आणि लिनेन पॅन्ट परिधान केली आहे. आता या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण अर्जुन कोण आहे? याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत.

कोण आहे अर्जुन बाजवा ? : अलीकडेच, अर्जुन बाजवानं स्पष्ट केलं होतं की, या फक्त अफवा आहेत, मात्र आता व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा एकदा डेटिंगच्या अफवांना उधाण आलं आहे. डिसेंबर महिन्यात, सारा आणि अर्जुन दोघेही एकाच वेळी राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना एकत्र दिसले होते. दोघांनी एकत्र एकही फोटो पोस्ट केला नाही, पण तरीही, लोकांनी असा अंदाज लावला की, ते एकत्र आहेत. याआधीही, दोघांचेही केदारनाथ धाम येथे दर्शनासाठी एकत्र गेले होते. यानंतर अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यादरम्यान सारा अर्जुनबरोबर फिरताना दिसली होती. तसेच अर्जुनबद्दल बोलायचं झालं तर तो एक अभिनेता आणि मॉडेल आहे. 2019 मध्ये अर्जुननं पंजाब जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. अर्जुननं 'बॅन्ड ऑफ महाराजा'मध्ये काम केलं आहे. अर्जुनची पंजाब पोलिसात इन्स्पेक्टर (ग्रुप बी) पदासाठी निवड झाली होती, मात्र तो तिथे रुजू झाला नाही.

हेही वाचा :

  1. सारा अली खाननं आई अमृता सिंग आणि प्रियजनांबरोबर केला वाढदिवस साजरा, फोटो व्हायरल - Sara Ali Khan birthday
  2. ड्रेसवर ज्यूस सांडल्यानंतर एअर होस्टेसवर भडकली सारा अली खान, व्हिडिओ व्हायरल - sara ali khans video viral
  3. कार्तिक आर्यननं सारा अली, कियाराला नाही तर विद्या बालनला म्हटलं 'फेव्हरेट' अभिनेत्री - Kartik Aaryan Favourite Co Star