मुंबई - साऊथ सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हैदराबादला परतले आहेत. मुलगा मार्कच्या शाळेत आग लागल्याची बातमी ऐकून पवन कल्याण अलीकडेच पत्नी अॅना लेझनेवा आणि मुलगी पोलेनासह सिंगापूरला रवाना झाले होते. आता पवन कल्याण आपल्या मुलासह सिंगापूरहून परतले आहे. ते हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी पवन कल्याण यांनी आपल्या मुलाला स्वत:च्या कडेवर घेतलं होतं. ते त्याच्या कुटुंबासह दिसत विमातळावर स्पॉट झाले. यापूर्वी, पवन कल्याणनं एक निवेदन जारी केलं, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'त्यांची ब्रॉन्कोस्कोपी केली जात आहे. त्याला जनरल एनेस्थीसिया दिला जाईल. समस्या अशी आहे की, त्याचा दीर्घकाळ परिणाम होईल. पंतप्रधान मोदींचे मी मनापासून आभार मानतो, ज्यांनी मला फोन करून सर्व काही ठीक होईल असं आश्वासन दिलं. त्यांनी सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्तालयामार्फत खूप मदत केली.'
पवन कल्याण झाला हैदराबाद विमानतळावर स्पॉट : सिंगापूरमधील रिव्हर व्हॅली परिसरात असलेल्या एका शाळेत नुकतीच आग लागली होती. या घटनेत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागल्यानं, अग्निशमन दलाच्या जवानांनी खिडक्या तोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या मुलांना जवानांनी आगीतून वाचवले. पवन कल्याणचा 8 वर्षांचा मुलगा आहे. तो देखील याच शाळेत शिकतो. या आगीच्या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला. पवन कल्याणचा मुलगा मार्क शंकरसह 19 मुले जखमी झाले होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच, सिंगापूर सिव्हिल डिफेन्स फोर्ससह आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली होती.
पवन कल्याणचं वर्कफ्रंट : मुलांना वाचवताना आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांनी केला. या घटनेमुळे ज्युनिअर एनटीआरनं देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मार्कबद्दल चिंता व्यक्त केली होती. दरम्यान पवन कल्याणच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'ओरिजिनल गैंगस्टर्स' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय त्याचा 'हरी हरा वीरा मल्लु' हा चित्रपट देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर बॉबी देओल, अर्जुन रामपाल आणि नोरा फतेही हे बॉलिवूड कलाकार दिसणार आहेत.
हेही वाचा :