ETV Bharat / entertainment

'देवमाणूस' चित्रपटामधील 'सोबती' गाणं प्रदर्शित, पाहा व्हिडिओ... - SOBATI SONG

'देवमाणूस' या चित्रपटामधील 'सोबती' गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यामध्ये महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची केमिस्ट्री खूप सुंदर आहे.

devmanus new romantic song  sobati
देवमाणूस चित्रपटातील रोमँटिक गाणं सोबती (Sobati song Poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 21, 2025 at 1:08 PM IST

1 Min Read

मुंबई - 'देवमाणूस' हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील नवीन रोमँटिक गाणं 'सोबती' हे प्रदर्शित झालं आहे. मैत्रीला अर्पण केलेलं हे सुंदर गाणं आहे. 'सोबती' गाणं या चित्रपटामधील तिसरे गाणं आहे. या गाण्यामध्ये महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांच्यामधील भावनिक प्रवास आणि त्यांच्यातील गोड सुंदर नात दाखविण्यात आलं आहे. 'सोबती' गाण्याला शेखर रावजियानी आणि आर्या आंबेकर यांनी गायलंय. या गाण्याला संगीत रोहन-रोहन यांनी दिलं आहे. या गाण्याचे गीतकार प्रशांत मडपुवार असून रोहन प्रधान यांनी काही अतिरिक्त ओळी दिल्या आहेत. या चित्रपटामधील हे गाणं खूप विशेष आहे.

'देवमाणूस' चित्रपटामधील गाणी : यापूर्वी 'पांडुरंग' या भावस्पर्शी गाणं रिलीज करण्यात आलं होतं. हे गाणं देखील अनेकांना खूप पसंत आलं होतं. यानंतर सई ताम्हणकरचं 'आलेच मी' ही लावणी प्रदर्शित करण्यात आली होती. ही लावणी देखील खूप हिट झाली होती. सईनं पहिल्यांदाचं लावणीवर डान्स केला आहे. दरम्यान 'सोबती' गाणं देखील अनेकांना आवडत आहे. अनेकजण आपल्या या गाण्यासाठी प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या गाण्यासाठी लिहिलं, 'खूप गोड गाणं आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'कित्ती गोड.' आणखी एकानं लिहिलं, 'खूप मस्त.' याशिवाय अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून महेश मांजरेकरचं कौतुक करत आहेत.

'सोबती' गाण्याबद्दल व्यक्त केल्या भावना : दरम्यान शेखर रावजियानी या गाण्याबद्दल सांगितलं की, "जेव्हा रोहन-रोहन यांनी मला 'सोबती'साठी संपर्क केला. तेव्हा या गाण्यातील साधेपणा आणि भावनिकता मला लगेच भावली. हे गाणे साकारताना खूप छान अनुभव आला आणि आम्हाला आशा आहे की, प्रेक्षक याच्या गाभ्याशी जोडले जाईल." तसेच आर्या आंबेकरनं गाण्याबद्दल म्हटलं, "शेखर सरांसोबत गायला मिळणं आणि रोहन-रोहन यांच्याबरोबर काम करणं हे स्वप्नवत होतं. हे गाणं अतिशय प्रेमळ आणि मनापासून गायलं आहे. आम्ही यात जेवढं प्रेम ओतलं आहे, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे, हीच इच्छा आहे." दरम्यान 'देवमाणूस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. 'देवमाणूस'चा टीझर 'छावा' चित्रपटासह महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये होईल प्रदर्शित!
  2. अभिनेते महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर
  3. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ शोमध्ये महेश मांजरेकरांची विठ्ठलनामात रंगलेली उपस्थिती.. पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.