ETV Bharat / entertainment

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे डिस्ट्रीब्युशन हक्क मिळाले पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्सला! - SITARE ZAMIN PAR DISTRIBUTION RIGHT

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे डिस्ट्रीब्युशन हक्क मिळाले पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्सला मिळाले आहेत.

Aamir khan
आमिर खान (Aamir khan ( Photo - Reporter ))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 29, 2025 at 4:38 PM IST

1 Min Read

मुंबई - आमिर खान प्रॉडक्शन्सचा आगामी चित्रपट 'सितारे जमीन पर' २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा स्पिरिच्युअल सीक्वेल मानला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना करत असून, तब्बल दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर आमिर खान पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत, यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती अशी की 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचे डिस्ट्रीब्युशन हक्क पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर्सने मिळवले आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटाचा ट्रेलर १ मे रोजी देशभरातील पीव्हीआर आयनॉक्सच्या चित्रपटगृहांमध्ये दाखवला जाणार आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपटाचे डिस्ट्रीब्युशन हक्क : एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान आणि पी व्ही आर आयनॉक्स यांच्यात दीर्घकाळापासून उत्तम संबंध आहेत. १४ मार्च रोजी आमिर खान यांच्या ६०व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पीव्हीआर आयनॉक्सच्या एग्झिबिशन टीमनं त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांचा देशभरात चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाच्या एक आठवडा आधीच, मुंबईच्या पीव्हीआर जुहूमध्ये आमिर आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यात एक विशेष संवाद सत्रही आयोजित करण्यात आले होते. त्यात या गोष्टीला उजाळा मिळाला की, 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा देखील पीव्हीआरसोबत घनिष्ठ संबंध होता. त्यावेळी पीव्हीआर पिक्चर्सनं हा चित्रपट सह-निर्मित केला होता, ज्यामध्ये संजीव कुमार बिजली आणि अजय बिजली यांनी आमिर खान प्रॉडक्शन्स सोबत भागीदारी केली होती.

'सितारे जमीन पर'चा ट्रेलर कधी होणार रिलीज : सूत्रानुसार, जर सर्व काही नियोजनानुसार झाले, तर ३० एप्रिल रोजी, आमिर खान डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर लॉन्च करतील आणि १ मेपासून तो देशभरातील सिनेमागृहांमध्ये 'रेड २', 'थंडरबोल्ट्स' आणि 'द भूतनी'सारख्या नव्या चित्रपटांबरोबर दाखवण्यात येईल. 'सितारे जमीन पर' या चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकांत झळकणार आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली आणि दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहे.

हेही वाचा :

  1. राजकुमार रावनं आमिर खानचा केला पत्ता कट, 'या' मोठ्या चित्रपटासाठी करेल काम?
  2. आमिर खान गर्लफ्रेंड गौरी स्प्रेटबरोबर चायनीज फेस्टिव्हलमध्ये झळकला, व्हिडिओ व्हायरल...
  3. सलमान - आमिर खान रुपेरी पडद्यावर करणार धमाल, 'अंदाज अपना अपना' होईल पुन्हा प्रदर्शित, नवीन ट्रेलर पाहा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.