मुंबई - मराठीमध्ये सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची संख्या खूप कमी आहे. या जॉनरचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतात हे खरं असलं तरी त्याचा तांत्रिक बाजू कुमकुवत झाली किंवा पटकथेत थोडी जर गडबड झाली तरी त्याकडं प्रेक्षक पाठ फिरवतात, असा पूर्वानुभव आहे. मात्र 'माझी प्रारतना' असं शीर्षक असलेला एक रोमांचक गूढ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या झलकनं प्रेक्षकांना खुर्ची घट्ट पकडून बसायला भाग पाडलंय.
चित्रपटाच्या टिझरमध्ये ब्रिटीश काळाची वास्तववादी पार्श्वभूमी दिसत असून यामध्ये दगाबाजी, प्रेम आणि वाट्टेल ती किंमत मोजून प्रेम पदरात पाडून घेण्याची जिद्द, अशा अंगावर शहारे आणणाऱ्या कथेची झलक पाहायला मिळत आहे. गावाच्या मातीत घडणाऱ्या या संगीतमय प्रेम कथेमध्ये प्रमात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना पार करण्याची शक्ती दिसत आहे.
MARATHI FILM 'MAJHI PRARTHANA' TEASER OUT NOW... 9 MAY 2025 RELEASE... A tale of love, sacrifice and resilience... Teaser of #Marathi film #MajhiPrarthana - starring #PadmarajRajgopalNair, #AnushaAdep and #UpendraLimaye - is LIVE.
— taran adarsh (@taran_adarsh) March 24, 2025
In *cinemas* 9 May 2025 by #AAFilms.
Written… pic.twitter.com/N3GZirwAKM
'माझी प्रारतना' चित्रपटाच्या या कथेत पद्मराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामध्ये मराठीतील अनेक नामवंत कलाकारही दिसत आहेत. पद्मराज राजगोपाल नायर यांनीच या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. पद्मराज नायर फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या सिनेमाला विश्वजीत सी.टी. यांचं संगीत आहे. पद्मराज हा साऊथ इंडियामध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत असून त्यानं मराठी सिनेमाची गरज ओळखून एका अनोख्या कथानकाला हात घातलाय. 'माझी प्रारतना'चा टिझर पाहताना लक्षातही येत नाही की आपण एका मराठी सिनेमाची झलक पाहतोय. या चित्रपटात दिसलेल्या दृष्यांचं ज्या पद्धतीन छायाचित्रण करण्यात आलंय ती पाहणं कमालीचं समाधानकारक आहे. एक अद्भूत अनुभूती हा सिनेमा देऊ शकतो याची खात्री टिझर पाहताना आल्याशिवाय राहात नाही.
चित्रपटाचं पोस्टर आणि पहिली झलक पाहून प्रेक्षक आचंबित होत आहेत. उत्कंठावर्धक कथानक असलेला 'माझी प्रारतना' हा चित्रपट येत्या 9 मे रोजी महाराष्ट्रात थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
हेही वाचा -