ETV Bharat / entertainment

गायिका नेहा सिंग राठोडविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल, जाणून काय आहे गुन्हा आणि कोणी केलेत आरोप? - SEDITION FIR AGAINST NEHA SINGH

गायिका नेहा सिंग राठोडच्या विरोधात लखनऊमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर तिनं केलेल्या पोस्टच्या संदर्भात तिच्यावर एफआयआर दाखल झाली आहे.

Neha Singh Rathore
गायिका नेहा सिंग राठोड ((Photo @ Neha Singh Rathore Insta and ANI ))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 28, 2025 at 2:45 PM IST

1 Min Read

लखनऊ (उत्तर प्रदेश) - लोक गायिका नेहा सिंग राठोडच्या विरोधात लखनऊमधील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या अनेक कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अलीकडेच काश्मिरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गायिका नेहा सिंग राठोड हिनं जी प्रतिक्रिया दिली होती त्याच्याशी संबंधीत ही एफआयआर आहे.

लोक गायिका नेहा सिंग राठोड हिनं तिच्या एक्स सोशल मीडियावर २३ एप्रिल रोजी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिनं मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार जात आणि धर्माच्या आधारावर राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. भाजपा सरकारनं यापूर्वी पुलवामा हल्ल्याच्या नावाखाली मते गोळा केली होती, त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली जाईल असंही तिनं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

नेहा सिंग राठोड हिची सोशल मीडिया पोस्ट जातीपातीवर आधारित असून यामुळे समाजात द्वेषाची आणि देशविरोधी भावना पसरवू शकते असा दावा पोलिसात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

लखनऊमधील हजरतगंज पोलीस स्टोशनमध्ये गायिका नेहा सिंग राठोडच्या विरोधात कवी अभय प्रताप सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे. नेहा हिनं समाजातील सांप्रदायिक शांतता बिघडवणारी आणि देशविरोधी आशय असलेली पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

लोक गायिका नेहा सिंग राठोड हिच्या विरोधात २७ एप्रिल रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार अनेक कलमं लागू करण्यात आली आहेत. यामध्ये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १९६(१)(अ), १९६(१)(ब), १९७(१)(अ), १९७(१)(ब), १९७(१)(क), १९७(१)(ड), ३५३(१)(क), ३५३(२), ३०२ आणि १५२ आणि माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) कायदा, २००८ च्या कलम ६९अ. या कलमांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

गायिका नेहा सिंग राठोडच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर तिनं एक व्हिडिओ पोस्ट करुन याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सरकाराच्या विरोधात प्रश्न विचारत असल्यामुळेच आपल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याचं तिनं म्हटलंय. भाजपा म्हणजे देश नसल्याचंही यात तिनं ठामपणे म्हटलंय.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.