मुंबई Stock Market Crash : जागतिक स्तरावरील घडामोडींचा फटका हा भारतीय शेयर बाजाराला बसत आहे. 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1500 अंकांच्या घसरणीसह 80,000 च्या खाली गेला, तर निफ्टी-50 देखील जवळपास 500 अंकांनी घसरली. या मोठ्या घसरणीत काही मिनिटांतच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे जवळपास १० लाख कोटी रुपये बुडाले.
#WATCH | Mumbai: On Sensex slumps by over 1600 points, Market Expert Sunil Shah says, " on the last trading day, friday we saw a deep cut in sensex. today, it opened on expected line with a gap down...we are seeing in the global market that there is selling pressure because the… pic.twitter.com/X1c64kiqrI
— ANI (@ANI) August 5, 2024
शेयर बाजारात 'ब्लॅक मंडे' : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (5 ऑगस्ट) शेअर बाजार घसरणीनंच उघडला. BSE सेन्सेक्स 1,310.47 अंक किंवा 1.62 टक्क्यांच्या घसरणीसह 79,671.48 वर उघडला, तर निफ्टी 404.40 अंक किंवा 1.64 टक्क्यांच्या घसरणीसह 24,313.30 वर उघडली. बाजार उघडल्यानंतर 2368 शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली, तर सुमारे 442 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. दोन्ही बाजार निर्देशांकातील ही सुरुवातीची घसरण काही मिनिटांत आणखी वाढली. सकाळी 9.20 वाजता सेन्सेक्स 1,585.81 अंकांनी किंवा 1.96% ने घसरून 79,396.14 च्या पातळीवर आला, तर निफ्टी 499.40 अंकांनी किंवा 2.02% ने घसरून 24,218.30 च्या पातळीवर आला.
10 लाख कोटी रुपयांचं नुकसान : शेअर बाजारातील या घसरणीमुळं शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. एकीकडं गेल्या शुक्रवारी बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांना सुमारे 4 लाख कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं होतं, तर दुसरीकडं सोमवारी अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे सुमारे 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.
#WATCH | Mumbai: Executive Chairman of OPC Asset Solutions, Ajay Bagga, says " this is on expected line. what we saw in the us market and this morning in the asian markets, us futures were down. 4 major reasons are behind this and the gap down opening it is on expected lines...the… pic.twitter.com/j26UORRrM9
— ANI (@ANI) August 5, 2024
अनेक क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यता : मुंबई शेअर मार्केटमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती जबाबदार ठरल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे रिअॅलिटी क्षेत्र, आयटी, बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे.