हैदराबाद 28 cars gifted employees : चेन्नईतील एका कंपनीनं दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क 28 मर्सिडीज बेंझ यांसारख्या कार भेट दिल्या आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी कंपनीनं त्यांनं अनोखी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. स्ट्रक्चरल स्टील डिझाइन डिटेलिंग फर्म, असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 28 कार आणि 29 बाइक भेट दिल्या आहेत.
प्रसिद्ध ब्रँडच्या कार भेट : कंपनीनं ह्युंदाई, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि मर्सिडीज-बेंझ यांसारख्या ब्रँडच्या सर्वोत्तम कार आपल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचं कौतुक करण्यासाठी दिवाळी भेट दिल्या आहेत. 2005 मध्ये स्थापन झालेल्या स्ट्रक्चरल स्टील डिझाइन डिटेलिंग फर्ममध्ये अंदाजे 180 कर्मचारी कार्यरत आहेत.
कंपनीनं कर्मचाऱ्यांचं योगदान त्यांच्या कामगिरीच्या आधारे केलं आहे. “कंपनीच्या यशात कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचं आम्हाला कौतुक करायचं होतं. आमचा विश्वास आहे, की आमचे कर्मचारी ही आमची सर्वात मोठी संपत्ती आहे. "आमच्या कर्मचाऱ्यांनी असाधारण वचनबद्धता आणि समर्पण दाखवलं आहे. आम्हाला त्यांच्या यशाचा अभिमान आहे."- श्रीधर कन्नन, व्यवस्थापकीय संचालक, स्ट्रक्चरल स्टील डिझाइन डिटेलिंग फर्म
28 कार गिफ्ट : कंपनीनं मारुती सुझुकी, ह्युंदाई, मर्सिडीज बेंझ या महागड्या गाड्या भेट म्हणून कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. 2022 मध्येही, त्यांच्या दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कार भेट दिली होती. “आम्ही अशा उमेदवारांची निवड करतो, जे खूप प्रेरित आहेत. त्यांच्यासाठी कार किंवा बाईक खरेदी करणं, हे स्वप्नासारखं आहे . आम्ही कर्मचाऱ्यांना बाईक भेट देत आहोत. 2022 मध्ये आम्ही आमच्या दोन वरिष्ठ सहयोगींना कार भेट दिल्या होत्या. आम्ही आज त्यांना 28 कार गिफ्ट केल्या आहेत. “त्यापैकी काही मारुती सुझुकी, ह्युंदाई, मर्सिडीज बेंझ आहेत.”, असं कन्नन यांनी सांगितलंय.
हे वाचलंत का :