खगरिया (पाटणा) - बिहारमधील खगरिया येथील नरेश हजारी यांच्या मिशा 14 इंच लांब आहेत, वयाच्या 70 व्या वर्षी त्यांच्या मिशा लांबलचक असल्यानं त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या मिशा गावातील लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्र आहे.
खगरियाच्या परबट्टा ब्लॉकमधील काबेला गावात नरेश हजारी राहतात. ते निवृत्त सीआयएसएफ जवान आहेत. नोकरीदरम्यान त्यांच्या मिशांची लांबी देशात दुसऱ्या क्रमांकावर होती. सरकारनं त्यांच्या मिशांच्या देखभालीसाठी नरेश हजारी यांना त्यांच्या पगारासह लाखो रुपये दिले होती. नोकरीदरम्यान त्यांच्या मिशा 42 इंच झाल्या होत्या, असा त्यांचा दावा आहे. नोकरीदरम्यान अनेक वेळा लांब मिशा असल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या मिशांच्या काळजीसाठी सरकारनं विशेष भत्ता दिला होता.
- नरेश हजारी हे पहिलवानदेखील आहेत: नरेश हजारी हे एक चांगले पहिलवानदेखील आहेत. त्यांनी विभागाच्या वतीनं अनेकवेळा त्यांनी कुस्तीदेखील केली आहे. त्यांनी सैन्याच्या वतीनं परदेशात कुस्तीमध्येही भाग घेतला आहे. त्यांनी परदेशी कुस्तीगीरांनाही पराभूत केले आहे. आजही ते लोकांना कुस्तीच्या युक्त्या सांगतात.
- वडिलांच्या निधनानंतर कापल्या होत्या मिशा- 1985 मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झालं. मृत्यूनंतर धार्मिक विधीप्रमाणं त्यांना मिशा कापाव्या लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा मिशा ठेवण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांच्या मिशा पूर्वीसारख्या लांब झालेल्या नाहीत. सध्या, त्यांच्या मिशा 14 इंच लांब मिशा आहेत.
2015 मध्ये नोकरीतून निवृत्त: 70 वर्षांचे नरेश हजारी यांना 1978 मध्ये सीआयएसएफमध्ये नोकरी मिळाली. नोकरी मिळण्यापूर्वीच त्यांना मिशा वाढवण्याची आवड होती. 2015 मध्ये ते सीआयएसएफमधून निवृत्त झाले. त्यानंतरही त्यांनी मिशा जपत वेगळी ओळख निर्माण केली.
- मिशा ही पुरुषाची शान : नरेश हजारी यांनी सांगितलं, सीआयएसएफमध्ये नोकरी मिळण्यापूर्वी त्यांनी मुक्ती सेवेतही कर्तव्य बजाविलं होतं. मिशा ही पुरुषाची शान आहे. त्यामुळे त्यांनी कधीही मिशा पूर्णपणे काढून टाकल्या नाहीत.
मिश्या वाढवण्याकरिता आहेत नियम आणि भत्ता: भारतीय पोलीस सेवा गणवेश नियमांनुसार, पोलीस फक्त व्यवस्थित छाटलेल्या मिश्या वाढवू शकतात. मिश्या झुकलेल्या नसाव्यात, हा नियम पाळणं अनिवार्य आहे. अनेक राज्यांमध्ये पोलिसांना मिश्या वाढवण्यासाठी विशेष भत्तादेखील मिळतो. दुसरीकडे, सुरक्षादलाकडून नौदल आणि हवाई दलातील जवानांना मिशा ठेवण्यास प्रोत्साहित केलं जातं. मिशा हे शौर्याचे प्रतीक मानलं जातं. उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना मिश्या ठेवण्यासाठी 250 रुपयांपर्यंत मासिक भत्ता मिळतो. ब्रिटिशांच्या काळापासून पोलिसांमध्ये मिशा ही ताकद आणि आदराचं प्रतीक मानलं जात आहे. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांना मिशा ठेवल्याबद्दल दरमहा 33 रुपये भत्ता मिळतो.
- प्रसिद्ध चित्रपट 'शराबी'मध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांचा "मिशा हो तो नथू लाल जैसी, वर्ण ना हो", असा डायलॉग आहे. या डायलॉगप्रमाणं अनेकांना वाटतयं, मिशा असाव्यात तर नरेश हजारी यांच्यासारख्या असाव्यात. अन्यथा मिशा नको.