गांधीनगर : नराधमानं एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर ऑगस्ट महिन्यात बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना वलसाड जिल्ह्यातील एका गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी जलद तपास करत प्रकरण न्यायालयात दाखल केलं. त्यामुळे न्यायालयानं 6 महिन्यांच्या आत नराधमाला जन्मठेप सुनावली. विशेष पोक्सो न्यायालयानं या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार : वलसाडमधील उमरगाम परिसरातील एका गावात 27 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना चांगलाच हादरा बसला. हा नराधम पीडितेच्या शेजारी राहत होता. त्यानं तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आणि पळून गेला.
नराधमाच्या एका तासात आवळल्या मुसक्या : नराधमानं तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन पोबारा केल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये मोठा संताप होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वलसाड पोलीस, गुन्हे शाखा पथक, विशेष ऑपरेशन ग्रूप आणि विशेष अधिकाऱ्यांचं एक पथक तयार करण्यात आलं. आरोपीला पकडण्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं. आरोपीनं गुन्हा करुन तो मूळ गावी झारखंडला पळून जाण्यासाठी निघाला होता, असं तपासात उघड झालं. वलसाड गुन्हे शाखेनं अवघ्या एका तासात महाराष्ट्र राज्यातून आरोपीला अटक केली.
बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीकडं : चिमुकलीवर बलात्कार झाल्याची तक्रार उमरगाव पोलीस ठाण्यात सायंकाळी दाखल करण्यात आली. घटनेची तक्रार येताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. पीडितेला वैद्यकीय उपचारांसाठी पाठवण्यात आलं. या गंभीर गुन्ह्यानंतर वलसाड पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. वलसाड पोलिसांनी आरोपीला अटक केली. एसआयटीनं फॉरेन्सिक, वैद्यकीय, तांत्रिक आणि साक्षीदारांचे पुरावे गोळा केले. पोलिसांनी फक्त 9 दिवसात विशेष पोक्सो न्यायालयात 470 पानांचं आरोपपत्र सादर केलं. या प्रकरणात भारतीय दंड संहिता (IPC) 2023 च्या कलम 65(2) आणि POCSO कायद्याच्या कलम 4, 5(M), 6, 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पॉक्सो न्यायालयानं दिला जलद निकाल : विशेष सरकारी वकील अनिल त्रिपाठी यांनी केवळ 6 महिन्यात खटला पूर्ण करून मजबूत बाजू मांडली. त्यामुळे न्यायालयानं 24 मार्च 2025 रोजी आरोपीला दोषी ठरवलं. त्याला न्यायालयानं जन्मठेप आणि 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच
हेही वाचा :