ETV Bharat / bharat

नक्षली कमांडर बसवराजूचा खात्मा: जाणून घ्या आतापर्यंत किती टॉपच्या नक्षलवाद्यांना जवानांनी पाठवलं यमसदनी - TOP MAOIST LEADERS WERE KILLED

सुरक्षा दलाच्या जवानांनी टॉपचा नक्षलवादी नेता बसवराजू याचा खात्मा करण्यात यश मिळवलं आहे. आतापर्यंत छत्तीसगडमध्ये किती नक्षलवादी नेत्यांना ठार करण्यात आलं, याबाबतची ही खास माहिती.

Top Maoist leaders were killed
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2025 at 11:33 AM IST

5 Min Read

रायपूर : छत्तीसगडमधील सुरक्षा दलांना नक्षलवादी कारवाईत मोठं यश मिळालं आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत नक्षलवादी नेता बसवराजू याला ठार मारलं आहे. नक्षली कमांडर बसवराजू याचा खात्मा केल्यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. गेल्या काही वर्षांत पोलीस चकमकीत मारल्या गेलेले सर्वोच्च नक्षवादी नेते कोण आहेत, ते जाणून घेऊया.

21 मे 2025 : सुरक्षा दलांच्या जवानांनी केलेल्या कारवाईत ठार झालेल्या 27 नक्षलवाद्यांमध्ये बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) चा सरचिटणीस बसवराजू याचा खात्मा करण्यात आला आहे. अलिकडच्या काळात नक्षलविरोधी मोहिमेतील हे सर्वात मोठं यश आहे. तब्बल 70 वर्षांचा बसवराजू हा भारतातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी नेत्यांपैकी एक होता. बसवराजू याच्या डोक्यावर 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस होतं.

21 जानेवारी 2025 : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीत 14 नक्षलवादी मारेल गेले. यात नक्षलवाद्यांमध्ये जयराम रेड्डी, ज्याला चलापती म्हणूनही ओळखलं जात होतं, त्याचा खात्मा करण्यात आला. त्याच्यासह अप्पाराव यालाही ठार करण्यात आलं. त्याच्या डोक्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. अप्पाराव हा एक वरिष्ठ नक्षलवादी नेता होता.

16 जानेवारी 2025 : (छत्तीसगड): तेलंगणामध्ये बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) ला सुरक्षा दलांच्या जवानांनी मोठा धक्का दिला. पक्षाचा राज्य समिती सचिव बडे चोक्का राव उर्फ ​​दामोदर हा छत्तीसगडच्या दक्षिण बस्तरमधील बिजापूर जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. मुलुगु जिल्ह्यातील समक्का सारक्का तडवई मंडळातील कलवापल्ली गावातील रहिवासी 55 वर्षीय दामोदर हा तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी होता. त्याच्यावर 50 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

13 नोव्हेंबर 2021 : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यात बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य मिलिंद तेलतुंबडे याचा समावेश होता. तेलतुंबडेवर 50 लाख रुपयांचं बक्षीस होतं. पोलिसांनी सांगितलं की, 58 वर्षीय तेलतुंबडे हा नक्षलवादी संघटनेच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) प्रदेशाचा प्रमुख होता. तो माजी आयआयटी प्राध्यापक, दलित विचारवंत आणि लेखक आनंद तेलतुंबडे यांचा धाकटा भाऊ होता. त्यांना एल्गार परिषद प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला आहे.

24 नोव्हेंबर 2016 : कुप्पू देवा राज उर्फ ​​कुप्पू स्वामी उर्फ ​​रमेश उर्फ ​​रायन्ना उर्फ ​​योगेश उर्फ ​​बालाजी (65) याला ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. तो एसडब्ल्यूआरबीएम, तामिळनाडू आणि केरळ, एसओसीचा प्रभारी आणि संपूर्ण पक्ष निर्मिती विभागात महत्त्वाची भूमिका बजावणारा नक्षलवादी नेता होता. मलप्पुरम जिल्ह्यातील निलांबूर जंगलात झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

ऑक्टोबर 2016: मलकानगिरी चकमक, ओडिशा: चार केंद्रीय समिती सदस्यांना यमदसनी धाडण्यात सुरक्षा दलांच्या जवानांना यश आलं. यात आंध्र ओडिशा छत्तीसगड विभागीय समितीचा सचिव दया उर्फ ​​गरला रवी, गणेश, मल्लेश हे या चकमकीत ठार झाले. चालपती उर्फ ​​अप्पा राव, त्यांची पत्नी अरुणा आणि आणखी एक नेता बकुरी वेंकट रमण मूर्ती यांचाही या चकमकीत मृत्यू झाला. रवीवर 20 लाख रुपयांचं बक्षीस होतं, तर पूर्व विभागाचा सचिव आणि चित्तूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या चालपतीवरही 20 लाख रुपयांचं बक्षीस होतं.

23 ऑगस्ट 2013 : ओडिशाच्या मलकानगिरी इथं सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 4 लाख रुपयांचं बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी नेता माधव उर्फ ​​गोल्ला रामुलु मारला गेला. माधव हा ओडिशाचा मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी होता. चित्रकोंडा जलाशयात 38 सुरक्षा दलातील जवानांची हत्या, खंडणी आणि भूसुरुंग स्फोटांसह अनेक खूनांमध्ये तो सहभागी होता.

24 नोव्हेंबर 2011 : मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ ​​किशनजी याला ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील बुरिसोल जंगलात झालेल्या चकमकीत पॉलिटब्युरो सदस्य किशनजी मारला गेला.

02 जुलै 2010 : चेरुकुरी राजकुमार उर्फ ​​आझाद याला ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. आंध्र प्रदेश पोलिसांनी आदिलाबाद जिल्ह्यातील जोगापूर जंगलात झालेल्या चकमकीत पॉलिटब्युरो सदस्य आझादला ठार मारलं.

12 मार्च 2010 : आंध्र प्रदेशातील प्रकाशम आणि वारंगल जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत दोन प्रमुख नक्षलवादी नेते मारले गेले. यात सखामुरी अप्पा राव आणि सोलिपेता कोंडल रेड्डी यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं. पोलिसांनी दोन्ही चकमकीच्या ठिकाणाहून एके-47 रायफल जप्त केल्या. मारल्या गेलेले दोन्ही नक्षलवादी नेते राज्य समिती सदस्य पातळीचे होते. अप्पा राववर 10 लाख रुपयांचं बक्षीस होतं, तर रेड्डीवर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं.

02 डिसेंबर 2009 : आदिलाबाद चकमक: केरामेरी पोलीस स्टेशन हद्दीतील काळेगाव-पिट्टागुडा जवळील जंगलात विशेष दलाच्या पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन कॅडर नक्षलवादी ठार झाले. मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. सीपीआय माओवादीचे अदलियााबाद जिल्हा समिती सचिव (डीसीएस) मैलारापू अडेलू उर्फ ​​भास्कर नरसन्ना आणि जिल्हा समिती सदस्य चिप्पाकुर्ती रवी उर्फ ​​सुदर्शन अशी त्यांची नावं आहेत. तिसऱ्याची ओळख पटलेली नाही.

24 मे 2009 : तडवई चकमक : तडवई जंगलातील लववाला गावाजवळील गौरप्पा टेकड्यांवर पोलिसांशीनक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत दोन प्रमुख नक्षलवादी नेते मारले गेले. यात पटेल सुधाकर रेड्डी उर्फ ​​सूर्यम उर्फ ​​श्रीकांत आणि कानुगुला वेंकटिया या दोघांचा खात्मा करण्यात आला. यातील एक केंद्रीय समिती सदस्य तर दुसरा राज्य समिती सदस्य होता.

15 जानेवारी 2009 : आंध्र प्रदेश चकमक: पोलिसांनी नक्षलवादी नेता करमथोटा गोविंदा नाईक उर्फ ​​संजीव उर्फ ​​राजू (34) याला प्रकाशम जिल्ह्यातील पुल्लालचेरुवू मंडलातील मुलमपल्ली गावात चकमकीत ठार केलं.

02 एप्रिल 2008 : वारंगल : आंध्र प्रदेश, छत्तीसगड राज्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला टॉप नक्षलवादी नेता गजेर्ला सरैया उर्फ ​​आझाद उर्फ ​​भास्कर चकमकीत ठार झाला. या चकमकीत आझादची पत्नीही मारली गेली.

01 जुलै 2007 : वारंगल चकमक वरिष्ठ सीपीआय (माओवादी) सदस्य चेट्टीराजा पापैया उर्फ ​​सोमन्ना पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. सोमन्ना हा उत्तर तेलंगणा विशेष विभागीय समितीचा सचिव सदस्य होता. दोन दशकांहून अधिक काळ तो भूमिगत होता.

22 जून 2007 : अनंतपूर: पोलिसांसोबत झालेल्या कथित चकमकीत नक्षलवादी नेता संदे राजामौली उर्फ ​​प्रसाद ठार झाला.

28 डिसेंबर 2006 : विशाखापट्टणम: नक्षलवादी नेता चंद्रमौली विशाखापट्टणम जिल्ह्यात ठार झाला. तो बराच काळ आंध्र-ओरिसा सीमेवर नक्षलवादी कारवायांचं नेतृत्व करत होता.

10 नोव्हेंबर 2006: गोपावरम : आंध्र प्रदेश राज्य सचिवालय सदस्य यालागला अप्पा राव उर्फ ​​ओबुलेसू याची गोपावरम जंगल परिसरात हत्या करण्यात आली.

12 ऑक्टोबर 2006: संगारेड्डी : जनशक्ती (राजन्ना गट) राज्य समिती सदस्य आणि मेडक समितीचा सचिव मंथुरी नागभूषणम (33) उर्फ ​​संजीव उर्फ ​​सुभाष याची चेगुंटा मंडलातील बोनाला गावाजवळ पोलिसांनी गोळ्या झाडून हत्या केली.

15 सप्टेंबर 2006 : वारंगल : वारंगल जिल्ह्यात सीपीआय (माओवादी) महादेवपूर भागातील सचिव अलवाल सरैया उर्फ ​​मधु याची हत्या करण्यात आली.

13 जुलै 2006: हैदराबाद : ए माधव रेड्डी आणि आयपीएस अधिकारी जी परदेसी नायडू, छ. उमेश चंद्रा आणि आमदार चौधरी नरसी रेड्डी यांच्या हत्येमागील सूत्रधार, सीपीआय (माओवादी) राज्य समितीचा सचिव माधव चकमकीत मारला गेला.

17 जून 2006 : नल्लामला फॉरेस्ट : मत्तम रविकुमार उर्फ ​​श्रीधर उर्फ अनिल याची येरागोंडापलेमजवळ हत्या करण्यात आली.

07 मार्च 2005: करीमनगर: CPI(ML) जनशक्ती नेते रियाझ याला करीमनगर जिल्ह्यातील मुस्ताबाद मंडलातील मोहिनीकुंटा गावाच्या बाहेरील चकमकीत गोळ्या घालून ठार करण्यात आलं.

02 नोव्हेंबर 1999 : करीमनगर जिल्ह्यात पोलीस आणि पीडब्ल्यूजी दलम यांच्यातील चकमकीत नल्ला आदि रेड्डी आणि आंध्र प्रदेश राज्य युनिट सेक्रेटरी महेश उर्फ ​​संतोष रेड्डी याच्यासह तीन केंद्रीय समिती सदस्य ठार झाले. त्यापैकी आणखी एक सीलम नरेश उर्फ ​​मुरली, जो पीडब्ल्यूजी दलमच्या उत्तर तेलंगणा समितीचा सचिव होता त्यालाही ठार करण्यात आलं. तीन पीडब्ल्यूजी नेत्यांवर प्रत्येकी 12 लाख रुपयांचं बक्षीस होतं.

10 जुलै 1970 श्रीकाकुलम: श्रीकाकुलम बंडाचा नेता वेंपतापू सत्यनारायण आणि आदिबाटला कैलास हे दोघं पोलिसांच्या चकमकीत मारले गेले.

हेही वाचा :

अभियांत्रिकीत एम टेक, राष्ट्रीय खेळाडू ते मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी: जाणून घ्या नक्षली कमांडर नंबला केशव रावचा थरारक प्रवास

नारायणपूर दंतेवाडा सीमेवर मोठी नक्षलवादी चकमक, अनेक नक्षलवादी ठार, एक जवान हुतात्मा आणि एक जखमी

पोलीस आणि TSPC नक्षलवाद्यांमध्ये चकमक : 10 लाखांचे बक्षीस असलेल्या शशिकांतसह अनेक टॉप नक्षलवाद्यांविरोधात एफआयआर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.