कठुआ (जम्मू-काश्मीर) : जगभरातील पर्यटकांसाठी जम्मू-काश्मीर एक नंदनवन आहे. त्यामुळं भारताच्या विरोधी देशांची वाकडी नजर कायमच या भागावर राहिली आहे. विविध कटकारस्थान करण्यासाठी घुसखोर सीमाभागातून भारतात प्रवेश करतात. मात्र, अशा या घुसखोर दहशतवाद्यांना जिथल्या तिथं ठोकण्यासाठी भारतीय सैन्य दल कायमच अलर्ट असतं. अशाच प्रकारे दहशतवाद्यांचा एक गट गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या कठुआ भागात शिरला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.
तीन दहशतवादी ठार : दहशतवाद्यांचे कारनामे धुडकावून लावण्यासाठी सुरक्षा दलानं कठुआ भागात शोधमोहीम राबवली होती. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली, जसं की गोळ्यांचा पाऊसच पडत आहे. दोन्ही बाजूनं जोरदार गोळीबार सुरू होता. यात तीन दहशतवादी ठार झाले, तर पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. या चकमकीत तीन शूर जवानांना वीरमरण आलं.
#WATCH | Security forces conduct anti-terrorist operation in Jammu & Kashmir's Kathua
— ANI (@ANI) March 28, 2025
Terrorists fired indiscriminately on our troops, and heavy fire-fight ensued. Operation under progress: Indian Army.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/DTDSGiPoO7
कठुआ परिसरात शोधमोहीम सुरू : परिसरात लपलेल्या सुमारे पाच दहशतवादी घुसखोरांच्या गटाचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलानी मोठी कारवाई सुरू केली आहे. कठुआ परिसरातील सन्याल जंगलात काही दिवसांपूर्वी एक दहशतवादी गट पळून गेला होता, त्यामुळं हा तोच गट आहे की नुकताच घुसखोरी केलेला हा दहशतवाद्यांचा नवीन गट आहे हे स्पष्ट झालेले नाही. कठुआ परिसरात सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरू केली आहे.
विशेष पोलीस अधिकारी जखमी : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत जोरदार गोळीबार आणि स्फोट झाले. राजबागच्या घाटी जुठाना भागातील जाखोले गावाजवळ झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सुरुवातीच्या गोळीबारात विशेष पोलीस अधिकारी भरत चलोत्रा जखमी झाले, त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. कठुआ येथील रुग्णालयात उपचारानंतर त्यांना जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आलंय. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्पेशल ऑपरेशन ग्रुपची कारवाई : जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) च्या नेतृत्वाखालील सैन्य दल, बीएसएफ आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह (SDPO) किमान तीन सुरक्षा कर्मचारी दाट झाडांनी वेढलेल्या नाल्याजवळ असलेल्या चकमकीच्या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. चकमक संपल्यानंतरच परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - कठुआमध्ये चकमक; सैन्य दलानं दहशतवाद्यांना घेरलं: मोठा शस्रसाठा जप्त