हैदराबाद : रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, रविवारी रामोजी ग्रुपच्या कॉर्पोरेट कार्यालयात रामोजी राव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
रामोजी राव यांच्या पुतळ्याचं अनावरण : यावेळी प्रिया फूड्सच्या संचालक सहारी, ईटीव्ही भारतचे एमडी बृहती, यूकेएमएलच्या संचालक सोहाना आणि दिविजा उपस्थित होते. या प्रसंगी, रामोजी राव यांचे नातेवाईक, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. आज तत्पूर्वी, कुटुंबातील सदस्यांनी रामोजी फिल्म सिटी (RFC) येथील स्मारक उद्यानाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष चेरुकुरी किरण, कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी शोकसभेला उपस्थित होते. शोकसभेच्या सभागृहात श्री रामोजी राव यांच्यावरील एक लघुपट दाखवण्यात आला.
रामोजी राव सरांच्या आठवणींना उजाळा : या लघुपटात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि दिवंगत चित्रपट पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांच्यासह सेलिब्रिटी आणि नेत्यांनी श्री रामोजी राव यांच्यावर केलेल्या हृदयस्पर्शी आणि भावनिक भाषणांचा समावेश होता.

आरएफसीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन : या कार्यक्रमाला शेकडो कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली आणि दूरदर्शी रामोजी राव सर यांना पुष्पांजली वाहिली. या प्रसंगी अनेक वरिष्ठ अधिकाऱयांनी उपस्थितांना संबोधित केले आणि श्री रामोजी राव यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. रेड क्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आरएफसी येथे ग्रुपने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ग्रुप कर्मचाऱ्यांनीही भाग घेतला होता.
हेही वाचा -