सौम्या हत्याकांडातील आरोपीनं मध्यवर्ती कारागृहातून केला पोबारा; प्रशासनाची पाचावर धारण, श्वान पथकानं केली कमाल
केरळमधील सौम्या हत्याकांड प्रकरणानं देशभर खळबळ उडाली होती. या प्रकरणी मारेकरी असलेला गोविंदाचामी कन्नूर कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र कारागृहातून त्यानं पोबोरा केला.

Published : July 25, 2025 at 2:05 PM IST
|Updated : July 25, 2025 at 2:13 PM IST
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये घडलेल्या सौम्या हत्याकांडानं देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणी अटकेत असलेला मारेकरी गोविंदाचामीला कन्नूर इथल्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र गोविंदाचामी हा कारागृहातून पळून गेल्यानं मोठी खळबळ उडाली. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्यानं कारागृह प्रशासनाची पाचावर धारण बसली. मात्र त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सूत्रं हलवत बहुचर्चित सौम्या हत्याकांडामधील मारेकऱयाला पुन्हा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कारागृह प्रशासनाची पाचावर धारण : सौम्या खून प्रकरणातील मारेकरी गोविंदचामी हा कारागृहातून पोबारा करण्यात यशस्वी झाला. त्यामुळे कारागृह प्रशासनावर मो नामुष्कीची वेळ आली. त्यामुळे कारागृह प्रशासनानं गोविंदाचामीला पकडण्यासाठी जंगजंग पछाडलं. त्यानंतर गोविंदाचामी यानं कोणाला दिसू नये, म्हणून डोक्यावर बंडल घेऊन फिरतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. या सीसीटीव्हीमुळे त्याला पकडणं सोप्प झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला कन्नूर शहराजवळील जंगलातील एका विहिरीत लपलेला असताना पकडण्यात आलं.
सुरक्षा यंत्रणेला चकवून गोविंदाचामी पळाला : कारागृह अधिकाऱ्यांना आज सकाळी गोविंदाचामी हा सुरक्षा रक्षकांचा गराडा असलेल्या कारागृहातील 10 व्या ब्लॉकमधून बेपत्ता असल्याचं आढळलं. तो शाल वापरून दुसऱ्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला, असा पोलिसांना संशय आहे. एक हात असलेल्या गोविंदाचामीला तुरुंगातून पळून जाण्यासाठी बाहेरील लोकांकडून मदत मिळाली असा दावा पोलिसांनी केला. गोविंदाचामी तुरुंगातून पळून गेल्याची माहिती बाहेर आल्यानंतर त्याचं सीसीटीव्ही फुटेज सापडलं. पोलिसांना हे फुटेज मिळालं. एका तरुणानं डोक्यावर गठ्ठा घेऊन चालणाऱ्या माणसाला पाहिलं आणि त्याचं नाव विचारलं. यावेळी तो पळून गेला. नंतर एका ऑटोरिक्षा चालकानं आणि त्या तरुणानं त्याचा पाठलाग केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. ही माहिती पोलिसांसाठी एक महत्त्वाचा धागा होती.
विहिरीतून पकडला गोविंदाचामी : तरुणाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डीसीसी कार्यालयाजवळील जंगलात आणि रिकाम्या इमारतींमध्ये शोध सुरू केला. यावेळी पोलीस दलातील श्वानानं इमारती धाव घेतली. शोध सुरू असताना गोविंदाचामी जवळच्या विहिरीत लपलेला आढळला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोलीस आल्याचं कळताच त्यानं विहिरीत उडी मारली. पोलिसांनी आणि स्थानिकांनी त्याला नाट्यमयरित्या विहिरीतून बाहेर काढलं. गोविंदाचामी पळाल्याची बातमी कळताच राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला. पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केली. जवळील पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, विमानतळ आणि सीमावर्ती भागात कसून तपासणी करण्यात आली.
हेही वाचा :
- शाळेच्या आवारात 6 वर्षाच्या चिमुकलीचा सापडला मृतदेह, मुख्याध्यापकाला अटक होताच धक्कादायक माहिती समोर - Gujarat School girl murder
- कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER
- उरण तरुणी हत्याकांड ; फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बोलावलं भेटीला, अन् मग तिनं लग्नास नकार देताच निर्घृणपणे भोसकलं - Uran Girl Murder Case

