ETV Bharat / bharat

शौर्य चक्र पुरस्कार विजेत्याच्या आईचाही निर्वासितांमध्ये समावेश; कुटुंबाने मोदी, शाह यांच्या हस्तक्षेपाची केली मागणी - DEPORTED FROM KASHMIR

दहशतवाद्यांशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या शौर्य चक्र पुरस्कार विजेत्याच्या आईलाही नवीन व्हिसा नियमानुसार भारत सोडून पाकिस्तानला जावं लागणार आहे. मोदींनी हे थांबवावं अशी मागणी होतेय.

शौर्य चक्र पुरस्कार विजेत्याची आई
शौर्य चक्र पुरस्कार विजेत्याची आई (PIB)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 29, 2025 at 10:08 PM IST

2 Min Read

श्रीनगर : तीन वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शौर्य चक्र पुरस्कार विजेत्याच्या आईचाही अधिकाऱ्यांकडून हद्दपार करण्यात येणाऱ्या ६० पाकिस्तानी नागरिकांमध्ये समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने शेजारील पाकिस्तानविरुद्ध अनेक उपाययोजना जाहीर केल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने सिंधू पाणी करार रद्द केला आहे आणि पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी केले आहेत. अल्पकालीन व्हिसावर असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत भारत सोडण्यास सांगितले होते. अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तंबी दिली होती.

"विविध जिल्ह्यांमधून सर्व पाकिस्तानी नागरिकांना बसमधून पंजाबला नेण्यात आलं, जिथे त्यांना वाघा सीमेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केलं जाईल," असे अधिकाऱ्यांनी सांगितलं. "निर्वासितांमध्ये काही अतिरेक्यांच्या पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे, जे २०१० च्या अतिरेक्यांच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत खोऱ्यात परतले होते. त्यापैकी ३६ जण श्रीनगरमध्ये, नऊ बारामुल्ला आणि कुपवाडामध्ये, चार बडगाममध्ये आणि दोन शोपियान जिल्ह्यात राहत होते," असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मे २०२२ मध्ये दहशतवाद्यांशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या कॉन्स्टेबल मुदासिर अहमद शेख यांची आई शमीमा अख्तर ही निर्वासितांपैकी एक आहे. मुदासिर हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या गुप्तहेरांच्या टीमचा भाग होते, त्यांनी परदेशी दहशतवाद्यांच्या गटाला रोखले. शेख यांना मरणोत्तर शमीमा यांनी त्यांच्या पतीसह मे २०२३ मध्ये दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार स्वीकारलाय.

राष्ट्रपतींच्या यूट्यूब अकाउंटवर प्रकाशित झालेल्या सन्मान सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री पुढच्या रांगेत बसलेले दिसत आहेत. शमीमा अख्तर आणि त्यांचे पती मोहम्मद मकसूद हे प्रस्तुतकर्ता त्यांच्या मुलाच्या शौर्याचे वर्णन करताना वाट पाहात आहेत. त्यानंतर राष्ट्रपती त्यांच्याकडे चालत जाताना पुरस्कार प्रदान करताना आणि आईला मिठी मारताना दिसतात.

पंतप्रधान गृहमंत्र्यांना आवाहन - "माझी मेहुणी पाकव्याप्त काश्मीरची आहे, जो आमचा प्रांत आहे. फक्त पाकिस्तानी लोकांनाच हद्दपार करायला हवे होते," असे स्पष्टपणे नाराज मुदसिर यांचे काका मोहम्मद युनूस यांनी पत्रकारांना सांगितले. मुदसिर यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुटुंबाला भेट दिली आणि उपराज्यपालांनीही दोनदा भेट दिली, असं ते म्हणाले. "माझी भाभी येथे आली तेव्हा ती २० वर्षांची होती आणि आता ४५ वर्षांपासून येथे राहात आहे. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आवाहन आहे की त्यांनी असे करू नये."

१९९० मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाचा उद्रेक होण्यापूर्वी शमीमा यांनी निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद मकसूद यांच्याशी लग्न केले होते. तर बारामुल्ला शहरातील मुख्य चौकाचे नाव पोलीस कर्मचाऱ्याच्या स्मरणार्थ शहीद मुदसिर चौक ठेवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.