श्रीनगर : भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये मागील महिन्यात दोन चकमकी झाल्या आहेत. दहशतवादी काश्मीर खोऱ्यात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील सूरनकोट इथल्या लसाना परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सैन्य दलाच्या जवानांना मिळाली. त्यामुळे जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी लसाना परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. सैन्य दलाच्या जवानांचा दहशतवाद्यांशी संपर्क झाला असून दहशतवाद्यांना पळून जाण्यास रोखण्यासाठी मोठी कूमक घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती सैन्य दलाच्या वतीनं देण्यात आली आहे.
#WATCH | Poonch, J&K | Cordon and search operation continues in the Lasana area of Surankote by the J&K Police and Romeo Force of the Indian Army, where contact was established with terrorists last night.
— ANI (@ANI) April 15, 2025
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/aPANDmEvNI
लसाना परिसरात लपले दहशतवादी : जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट इथल्या लसाना भागात दहशतवादी लपल्याची माहिती सैन्य दलाला मिळाली होती. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्य संपर्क स्थापित केला आहे. लसाना परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी ही कारवाई सुरू करण्यात आली. सोमवारी रात्री सुरनकोटमधील लसाना इथं जम्मू काश्मीर पोलीस आणि सैन्य दलाच्या जवानांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित झाला. घटनास्थळावर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे," असं सैन्य दलाच्या 16 व्या कॉर्प्सनं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे 9 एप्रिलपासून जम्मू काश्मीरच्या या प्रदेशात सुरू असलेली ही तिसरी कारवाई आहे.
हेही वाचा :