नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर' राबवत असताना आम्ही पाकिस्तानचा तो भेसूर चेहरा पाहिला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांना निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी गेले होते. दहशतवादी देश असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. भारत आणि भारताच्या नागरिकांना कुठल्याही संकटापासून वाचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. युद्धात आपण कायमच पाकिस्तानला धूळ चारली आहे. आता 'ऑपरेशन सिंदूर' राबवून कारवाईचे नवे आयाम आपण आखले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आम्हाला ब्लॅकमेल करु नये : "मी पुन्हा एकदा सांगतो, भारतानं पाकिस्तान विरोधातली कारवाई ही फक्त स्थगित केली आहे. पाकिस्तानने आगळीक केली तर त्यावर आपलं लक्ष आहे. भारतावर आता दहशतवादी हल्ला झाला तर करारा जवाब मिळेल. आपण आपल्या पद्धतीने उत्तर द्यायचं. कठोर कारवाई त्या प्रत्येक जागी होईल जिथे दहशतवादाची मूळं रुतली आहेत. पाकिस्तानने अणुबॉम्ब आहे हे सांगून आम्हाला ब्लॅकमेल करु नये. भारताला अचूक कारवाई करता येईल," असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला.
पाकिस्तानला ठणकावलं : "'ऑपरेशन सिंदूर'ने दहशतवादाविरोधातील लढाईत नवा अध्याय चालू केला. पहिली गोष्ट म्हणजे, भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटींवर उत्तर देणार. ज्या ठिकाणाहून दहशतवाद पोसला जात आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही कठोर करावाई करू. दुसरी गोष्ट, अणुयुद्धावरून केलं जाणारं ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही. अणुयुद्धाच्या ब्लॅकमेलिंगच्या आडून पोसल्या जात असलेल्या दहशतवादी तळांवर भारत निर्णायक हल्ला करू शकतं. तिसरी गोष्ट म्हणजे, दहशतवादाला पोसणारे सरकार आणि दहशतवादाचे म्होरके यांना आम्ही वेगळं पाहणार नाही,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलं.
हेही वाचा -