नवी दिल्ली : पुण्यातील कुंडमळ्याजळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून 20 ते 25 जण नदीतून वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचा आढावा घेतला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सगळ्या जुन्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन घटनेचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सायप्रस या देशाच्या भेटीवर आहे. मात्र पुण्यातील मावळमध्ये घडलेल्या पूल अपघातामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेचा आढावा घेतला.
गृहमंत्री अमित शाहांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला, यावेळी त्यांनी सोशल माध्यमांवर याबाबतची माहिती दिली. "पुण्यातील तळेगाव इथं इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं खूप दुःख झालं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलून परिस्थितीची विचारपूस केली. एनडीआरएफ पथकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, बचाव कार्यात सहभागी झाले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचवले. कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मनापासून प्रार्थना," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हेही वाचा :