नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ पुन्हा एकदा महाराष्ट्रातील न्यायाधीश घेणार आहेत. न्यायाधीश बी. आर. गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत. ते १४ मे रोजी शपथ घेऊ शकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पदाची शपथ देणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश बी. आर. गवई यांची उत्तराधिकारी म्हणजे सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली. बीआर गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. नोव्हेंबर २०२४ मध्ये सरन्यायाधीश न्यायाधीश संजीव खन्ना यांनी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्यापूर्वी धनंजय चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश पदाची जबाबदारी सांभाळली होती.
सरन्यायाधीशांना नियुक्तीपूर्वी उत्तराधिकाऱ्याची करावी लागते शिफारस- सरन्यायाधीश पदासाठी सुमारे ६ महिने काम केल्यानंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना १३ मे रोजी निवृत्त होणार आहे. ५३ वे सरन्यायाधीश म्हणून निवडलेले न्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ ६ महिन्यांहून अधिक असणार आहे. ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत. संजीव खन्ना यांनी प्रस्थापित पद्धतीनुसार केंद्र सरकारला पत्र लिहून सर्वात वरिष्ठ न्यायाधीश म्हणून न्यायाधीश गवई यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली आहे. मेमोरँडम ऑफ प्रोसिजरनुसार, निवृत्त होणाऱ्या सरन्यायाधीशांना निवृत्तीच्या एक महिना आधी उत्तराधिकारी म्हणून नियुक्तीची शिफारस करावी लागते.
सरकारी वकील ते सरन्यायाधीश- २९ मे २०१९ रोजी न्यायाधीश गवई यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. नोव्हेंबर २००३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होते. तर नोव्हेंबर २००५ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले होते. खंडपीठात पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी संवैधानिक कायदा आणि प्रशासकीय कायद्यात वकिली केली. नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठासाठी त्यांनी वकील म्हणून काम केले आहे. ऑगस्ट १९९२ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. १७ जानेवारी २००० रोजी त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली.
हेही वाचा-