रांची- सुरक्षादलाला नक्षलवादी कारवाईत मोठं यश मिळालं आहे. छत्तीसगडमधील विजापूर येथील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत टॉप नक्षलवादी नेता नरसिंहचलम उर्फ सुधाकर ठार झाला. ही कामगिरी डीआरजी, एसटीएफ आणि कोब्रा जवानांनी केली आहे. नरसिंह चेलम हा तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मोस्ट वाँटेड होता. सुरक्षादलानं चकमकीनंतर शोध मोहिमेदरम्यान, एके-४७ रायफलसह मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त केली आहेत.
टॉप नक्षलवादी नेता नरसिंहचलम ठार - सुरक्षादलानं नक्षलवादी नेता बसवराज उर्फ नंबला केशव रावला 21 मे रोजी ठार केलं होतं. या कारवाईनंतर सुरक्षादलानं आणखी टॉप नक्षलवादी नेत्याला ठार केलं आहे. राष्ट्रीय उद्यानात काही मोस्ट वाँटेड नक्षलवादी कार्यकर्त्यांची उपस्थित असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि विशेष कार्य दल (एसटीएफ) यांच्या संयुक्त पथकानं वन परिसरात शोधमोहिम सुरू करत कारवाई केली.
कोण आहे सुधाकर?67 वर्षांचा नक्षलवादी सुधाकर हा गौतम सुधाकर, गौतम, आनंद, चंटी बालकृष्ण रामराजू आणि सोमन्ना या टोपणनावांनी ओळखला जात होता. सुधाकरनं केंद्रीय समितीचं सदस्य म्हणून काम केलं होतं. मध्य भारतातील नक्षलवादी चळवळीचा प्रमुख विचारवंत आणि रणनीतीकारांपैकी एक मानला जात होता. सुधाकर हा 40 वर्षांहून अधिक काळ नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. सुधाकर हा आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी प्रदेशातील चिंतलपुडी मंडलमधील प्रगडावरम गावचा रहिवासी होता. आदिवासी भागात नक्षलवादी प्रभाव पसरवण्यात आणि कामगारांना संघटित करण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानं २००४ मध्ये सरकारसोबत झालेल्या शांतता चर्चेत भाग घेतला होता.
शोधमोहिम सुरू- नक्षलवादीविरोधी मोहिमेचे एडीजी विवेकानंद सिन्हा, बस्तरचे आयजी सुंदरराज पी, सीआरपीएफचे आयजी राकेश अग्रवाल हे राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरू असलेल्या चकमकीवर लक्ष ठेवून आहेत. या परिसरात सुरू असलेल्या शोध मोहिमेवर विजापूरचे एसपी जितेंद्र कुमार यादव आणि डीआयजी कमलोचन कश्यप, एएसपी मयंक गुर्जर हे देखरेख करत आहेत. तेलंगणा राज्य समितीचे प्रेस प्रभारी बंदी प्रकाश यांच्यासह अनेक मोठे नक्षलवादी बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची बातमी मिळताच सुरक्षादलानं परिसराला वेढा घातला. त्यानंतर नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू केली.
जानेवारीपासून सुरक्षा दलानं मोठ्या कारवाया करत अनेक नक्षलवादी नेत्यांना ठार केलं आहे.
- 21 मे 2025: सुरक्षा दलांनी 28 नक्षलवाद्यांना ठार केला. यामध्ये सीपीआयचा (माओवादी) सरचिटणीस बसवराजू याचा समावेश होता. अलीकडच्या काळात सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांनी हे मिळविलेलं सर्वात मोठे यश होते.
- 21 जानेवारी 2025: छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षादलाबरोबर झालेल्या भीषण चकमकीत 14 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये जयराम रेड्डी, ज्याला चलापती यांचा समावेश होता. जयराम रेड्डीच्या डोक्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
- 16 जानेवारी 2025: छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील जंगलात सुरक्षादलाबरोबर झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचा सचिव बडे चोक्का राव उर्फ दामोदरला ठार करण्यात आलं होतं.
हेही वाचा-