नवी दिल्ली- नॅशनल हेराल्ड प्रकरणात सक्त अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचीही नावेही आहेत. हे आरोपपत्र दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल करण्यात आलं आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची कंपनी असलेल्या यंग इंडियननं असोसिएटेड जर्नल प्रेस लिमिटेडची (एजेएल) २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता केवळ ५० लाख रुपयांमध्ये विकत घेतल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला. एक प्रकारची आर्थिक फसवणूक करून ९८८ कोटी रुपयांची बेकायदेशीरपणं उत्पन्न मिळविल्याचा झालाचा दावा ईडीनं केला. या प्रकरणाची सुनावणी २५ एप्रिलला दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात होणार आहे.
काय आहेत ईडीचे आरोप?नोव्हेंबर २०२३ मध्ये ईडीनं एजेएलची ६६१ कोटी रुपयांची मालमत्ता आणि ९०.२ कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले होते. त्यामधून शेअरची विक्री होऊ नये, असा हेतू होता. यंग इंडियननं एजेएलच्या मालमत्ता बेकायदेशीरपणं खूप कमी विकत घेतल्याचा ईडीनं दावा केला. ईडीनं काँग्रेसशी संबंधित नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी (एजेएल) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशी केली. ईडीनं जप्त केलेल्या ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेच्या प्रकरणात नोटीस बजावली आहे. ईडीने दिल्ली, लखनऊ आणि मुंबईच्या संबंधित मालमत्ता नोंदणीकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. ईडीकडून झालेली चौकशी म्हणजे सूड उगविण्यासाठी रणनीती असल्याचं यापूर्वी काँग्रेसनं म्हटलं होतं. तर ईडीला भाजपाचा मित्रपक्ष म्हटलं होतं. २६ जून २०१४ रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटनं दखल घेतल्यानंतर ईडीनं २०२१ मध्ये तपास सुरू केला.
कारवाई करण्याला न्यायालयाची परवानगी- सोनिया गांधी, त्यांचे खासदार पुत्र राहुल गांधी, दिवंगत काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा, यंग इंडियन या खासगी कंपनीसह अनेक प्रमुख राजकीय व्यक्तींनी गुन्हेगारी कट केल्याचा ईडीनं म्हटलं आहे. या सर्वांवर मनी लाँड्रिंग योजनेत सहभागी असल्याचा आरोप आहे.आरोपींनी कायदेशीर कारवाईला आव्हान दिलं होतं. परंतु, दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं तपास पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिली.
काय आहे नॅशनल हेराल्डचा इतिहास? १९३७-३८ मध्ये द. असोसिएटेड जर्नल लि. या नावानं एक कंपनी स्थापन झाली. या कंपनीत सुमारे ५ हजार गुंतवणूकदार होते. या गुंतवणूकदारांमध्ये तत्कालीन काँग्रेसचे नेते जवाहरलाल नेहरू होते. बहुतेक गुंतवणूकदार काँग्रेस कार्यकर्ते होते. कंपनीनं नॅशनल हेराल्ड (इंग्रजीत), नवजीवन (हिंदी) आणि कौमी आवाज (उर्दूमध्ये) ही तीन वर्तपमानपत्र प्रकाशित करण्यास सुरुवात केली. द असोसिएटेड जर्नल लिमिटेड सतत तोट्यात जात असताना वर्तमानपत्राचं प्रकाशनं २००८ मध्ये बंद केलं. नॅशनल हेराल्ड हे एजेएल द्वारे प्रकाशित केलं जातं. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचं आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडं यंग इंडियनचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स आहेत.
हेही वाचा-