अहमदाबाद- काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारकडून जातीय ध्रुवीकरण होत असल्याचा आरोप केला. तसेच मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळा केल्याचा खरगे यांनी आरोप केला. देशात लोकशाही हळूहळू संपुष्टात येत असल्याचा त्यांनी दावा केला.
गुजरातमधील अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) अधिवेशनात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ६० वर्षांहून अधिक काळानंतर गुजरातमध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचे दोन दिवसांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पक्षाच्या अधिवेशनाला संबोधित करताना, खरगे यांनी मतपत्रिका वापरून निवडणुका घेण्याची मागणी केली. सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत फायदा होईल, असे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यामुळे विरोधकांचं नुकसान होत आहे, असा त्यांनी दावा केला.
नोकरीच्या शोधात विदेशात स्थलांतरित झालेल्यानं हद्दपार केले जाते. अनेकदा बेड्या घालून ताब्यात घेतले जाते. श्रीमंत आधीच विदेशात स्थायिक झाले आहेत. आपल्या तरुणांना बेड्या घालून परत आणलं जात आहे. परंतु पंतप्रधान गप्प आहेत-काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे
सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकून टाकतील-खरगेपुढे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं नाव घेण्यात आले. परंतु त्यांना बोलू दिले नाही. हे लोकशाहीसाठी लज्जास्पद आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संसदेत झालेल्या चर्चेवरून त्यांनी टीका केली. खरगे म्हणाले, जातीय ध्रुवीकरणासाठी सरकारकडून रात्री उशिरापर्यंत संसदेत चर्चा सुरू होती. तर मणिपूरवर केवळ काही काळ चर्चा झाली. सरकार मणिपूरबाबत काहीतरी लपवू इच्छित आसल्याचा खरगे यांनी आरोप केला. अमेरिकन शुल्क लादलल्यानंतर सरकारनं संसदेत हा मुद्दा उपस्थित करू दिला नाही. गेल्या ११ वर्षांत सत्ताधारी पक्षाकडून संविधानासह घटनात्मक संस्थांवर भाजपाकडून सतत हल्ले करण्यात येत आहेत. सरकारी कंपन्या विकण्यात आल्या आहेत. जर ही अशीच परिस्थिती चालू राहिली तर एक दिवस हे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकून टाकतील, असा दावा खरगे यांनी केला. मतदार यादीतील कथित फेरफार झाल्याचा त्यांनी दावा केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे तेवढी फसवणूक झाली. आपल्याला याविरुद्ध लढावं लागणार आहे, असे खरगे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
हेही वाचा-