ETV Bharat / bharat

विकृतीचा कळस; तरुणाचा बकरीवर बलात्कार, मालकानं पीडित बकरी घेऊन गाठलं पोलीस ठाणे - MALDA MAN ACCUSED OF RAPING GOAT

शेतात चरणाऱ्या बकरीवर नराधमानं बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. नराधमानं बकरीमालकावर हल्ला केल्यानं चार जण जखमी झाले. पीडित बकरीला घेऊन मालकानं पोलीस ठाणे गाठलं.

Malda man accused of raping goat
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 26, 2025 at 10:18 AM IST

2 Min Read

कोलकाता : एक बकरी विकृत तरुणाच्या वासनेची बळी ठरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या नराधमानं चक्क बकरीवर बलात्कार केल्याचा आरोप करत मालकानं पीडित बकरी घेऊन पोलीस ठाणे गाठलं. ही घटना पश्चिम बंगालमधील मालदामध्ये घडली. मात्र बकरीमालकानं या तरुणाला पकडल्यानंतर त्यानं घटनास्थळावरुन पळून गेला. त्यानंतर थोड्या वेळानं परत येत त्यानं बकरी मालकावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. यावेळी झालेल्या मारहाणीत बकरीमालकाची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

मालदामध्ये नराधमाचा बकरीवर बलात्कार : मालदामधील एका गावातील बकरी मालक आपल्या बकऱ्या चारण्यासाठी मंगळवारी शेतात गेला होता. यावेळी त्यानं बकऱ्यांना चरण्यासाठी शेतात सोडलं. मात्र तासाभरानंतर तो शेतातील बकऱ्यांना पाहण्यासाठी गेला, मात्र त्याला त्याची एक बकरी सापडली नाही. खूप शोध घेतल्यानंतर त्याला शेताच्या एका कोपऱ्यात बकरीचा आवाज ऐकू आला. त्यामुळे त्यानं शेतातील बकरी असलेल्या परिसरात गेला असता, त्याला मोठा धक्का बसला. गावातील एक नराधम त्याच्या बकरीच्या तोंडावर टॉवेल बांधून तिच्यावर बलात्कार करत होता. मात्र बकरी मालकाचा आवाज येताच तो तिथून पळून गेला. त्यामुळे हादरेल्या बकरी मालकानं बकरीला घरी आणलं. ही घटना त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितली. त्यामुळे ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली, असं गावकऱ्यांनी सांगितलं.

नराधमाचा बकरी मालकाच्या कुटुंबावर हल्ला : नराधमानं बकरीवर बलात्कार केल्याचा आरोप बकरीमालकानं केला आहे. मालकानं बकरीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पाहिल्यानं त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नराधम घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर त्यानं दारूच्या नशेत बकरी मालकाच्या कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. या मारहाणीत बकरी मालकाची पत्नी जखमी झाली. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बकरीमालक आणि त्यांच्या भावालाही रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यानंतर पीडित कुटुंबीयांनी नराधमाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पीडित बकरीसह स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार देखील दाखल केली आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे. घटनेची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पसरताच खळबळ उडाली.

गावकऱ्यांनी घेतली धाव : नराधम तरुणानं बकरीमालकाला मारहाण केल्यानं मोठी खळबळ उडाली. नराधमानं बकरी मालकाच्या कुटुंबीयांवर हल्ला केला, त्यावेळी गावकऱ्यांनी धाव घेतली. त्यामुळे नराधम घटनास्थळावरुन पळून गेला. मात्र त्याच्या हल्ल्यात बकरीमालकाचं कुटुंब गंभीर जखमी झालं. यावेळी बकरी मालकानं “मी माझ्या चरण्यासाठी बकरी सोडली होती. त्यानंतर मी बकऱ्या चरत आहेत, की नाही हे पाहण्यासाठी गेलो. यावेळी एक बकरी तिथं नव्हती. मी घरी आल्यावर सर्वांना याबद्दल सांगितलं. मग आम्ही सर्वजण बकरी शोधण्यासाठी बाहेर पडलो. मला शेतातील दुसऱ्या भागातून बकरीचा आवाज आला. यावेळी मी तिकंड गोलो असता, नराधम माझ्या बकरीवर बलात्कार करत होता. त्यानं बकरीचं तोंड टॉवेलनं बांधलं होतं. मी त्याकडं धावताच तो नराधम पळून गेला. मी बकरी घेऊन घरी परतलो. त्यानंतर थोड्या वेळानं त्या नराधमानं माझ्या पत्नीवर हल्ला केला. तेव्हा मी माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलो, तर त्यानं माझ्यावर वार केला. त्यानं मला काठीनं जोरदार मारहाण केली. त्यानं माझ्या भावाला आणि आईलाही मारहाण केली. मी त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.” संबंधित पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "आम्ही यापूर्वी कधीही पोलीस ठाण्यात अशी तक्रार दाखल झालेली पाहिली नाही. पीडितांच्या तक्रारीवरुन आम्ही आरोपी तरुणाचा शोध सुरू केला आहे. मात्र तो काल संध्याकाळपासून फरार आहे. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांना हरिश्चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करावं लागलं. संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे."

हेही वाचा :

  1. उमरगाम बलात्कार प्रकरण : नराधमाचा तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; न्यायालयानं 6 महिन्यातच ठोठावली जन्मठेप
  2. जीममधील ओळखीतून फुललं प्रेम; तरुणीनं ब्लॅकमेल करत प्रियकराला दिली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी
  3. बेपत्ता विद्यार्थिनीचा झाडावर आढळला मृतदेह; दोन डोळेही गायब, कुटुंबीयांचा 'हा' गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.