बंगळुरू : कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीच्या 18 आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचा अनादर केल्याबद्दल आणि गैरवर्तन केल्याबद्दल शुक्रवारी विधानसभेतून सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. या निर्णयाला सत्ताधारी पक्षाने पाठिंबा दिला आहे. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपानं राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
भाजपाचे 18 आमदार निलंबित : विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी या 18 आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला. हनीट्रॅपच्या आरोपांची न्यायालयीन किंवा सीबीआय चौकशीची मागणी करत या आमदारांनी अध्यक्षांच्या व्यासपीठावर चढून त्यांच्यावर कागद फेकले होते. सत्ताधारी पक्षाने या निर्णयाला पाठिंबा देत संबंधित आमदारांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची मागणी अध्यक्षांकडं केली होती.
#WATCH | Bengaluru: Karnataka Assembly passes the Bill for suspension of 18 BJP MLAs for six months for disrupting the proceedings of Assembly. The Bill was tabled by Karnataka Law and Parliamentary Affairs Minister HK Patil.
— ANI (@ANI) March 21, 2025
(Video Source: Karnataka Assembly) pic.twitter.com/rPtFJLWH5D
निलंबित करण्याचे विधेयक मंजूर : निलंबनानंतर आमदारांनी विधानसभेच्या बाहेर येण्यास नकार दिला होता, त्यानंतर मार्शल कर्मचाऱयांनी निलंबित आमदारांना विधानसभेच्या बाहेर काढले. त्याचवेळी सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.
आरोप-प्रत्यारोप : "भाजपा आमदारांची वागणूक ही उद्धट होती. घटनेनं मला खूप दु:ख झालं. हे सभागृह आणि अध्यक्षांची खुर्ची लोकशाहीचे प्रतीक आहेत. काही सदस्यांनी त्याचं पावित्र्य नष्ट केलं," अशी प्रतिक्रिया कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच.के.पाटील यांनी दिली. तसंच या प्रकरणी भाजपानं राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
निलंबित आमदारांची नावं : निलंबित आमदारांमध्ये दोड्डंगौडा पाटील, सीएन अश्वथनारायण, बी सुरेश गौडा, उमानाथ कोट्यान, सीके राममूर्ती, धीरज मुनिराजू, मुनीरथना, एसआर विश्वनाथ, डॉ भरत शेट्टी, डॉ चंद्रू लमाणी, बसवराज मत्तीमुडू, शैलेंद्र बेलडाले आणि इतरांचा समावेश आहे. निलंबनानंतर आमदारांनी विधानसभा सोडण्यास नकार दिला होता, त्यानंतर मार्शल कर्मचाऱ्यांनी निलंबित आमदारांना विधानसभेच्या बाहेर काढले.
हेही वाचा - न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलं मोठं डबोलं, न्यायवृंदानं कारवाई म्हणून केली बदली