ETV Bharat / bharat

अमेरिकेच्या उपाध्यक्षांचा कुटुंबासह आजपासून चार दिवसीय भारत दौरा, भारतीय पोषाखात दिसली तिन्ही मुलं - JD VANCE INDIA VISIT

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषासह नवी दिल्लीत पोहोचले आहेत. या जोडप्याच्या तिन्ही मुलांनी भारतीय पोशाख परिधान करून सर्वांना चकित केलं

JD Vance India visit
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासमवेत (Source- ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 21, 2025 at 3:04 PM IST

1 Min Read

नवी दिल्ली- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आयातशुल्क जगभरातील देशांवर लादले जात असताना अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स (JD Vance India visit) हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या २१ ते २४ एप्रिल दरम्यानच्या चार दिवसीय दौऱ्यात आयातशुल्कासह विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, व्हान्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा व्हान्स आणि त्यांच्या मुलांसह पहिल्यांदाच भारत भेटीवर आले आहेत. त्यांचे विमान सकाळी ९:३० वाजता नवी दिल्लीतील पालम हवाई दल स्टेशनवर उतरले. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे अमेरिकेच्या उपाध्यक्षांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. अश्विनी वैष्णव यांनी पांढरा कुर्ता पायजमा घातला होता. त्यांनी व्हॅन्सच्या मोठ्या मुलाशी संवाद साधला. जेडी व्हान्स यांच्या आगमनानंतर त्यांना समारंभपूर्वक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यासोबतच त्यांचा प्रवास औपचारिकपणे सुरू झाला.

तिन्ही मुलांनी परिधान केला भारतीय पोषाख- जेडी व्हान्सच्या तिन्ही मुलांनी भारतीय पोषाख परिधान केल्याचं दिसून आलं आहे. इवान, विवेक ही दोन्ही मुल आणि मुलगी मेरीबेल हे तिघेही पारंपारिक भारतीय पोशाखात होते. जेडी व्हान्स यांनी लाल टायसह क्लासिक नेव्ही ब्लू सूट घातला होता. उषा व्हान्स यांनी लाल बॉडीकॉन ड्रेस आणि पांढऱ्या ओव्हरकोट घातला होता. इवान आणि विवेकनं निळा आणि चमकदार पिवळा कुर्ता-पायजमा घातला. मेरीबेलने निळ्या रंगाच्या भरतकाम केलेल्या अनारकली जॅकेट सूटसोबत स्नीकर्स घातले. विमानाच्या पायऱ्या उतरत असताना जेडी व्हान्स आपल्या मुलीला प्रेमानं मिठीत घेताना दिसून आले.

अमेरिकेचे उपाध्यक्ष ऐतिहासिक स्थळांना देणार भेट- उपराष्ट्रपती व्हान्स आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील औपचारिक बैठक संध्याकाळी ६:३० वाजता पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य आणि संरक्षण भागीदारीशी संबंधित बाबींवर सखोल चर्चा होईल, असा अंदाज आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि त्यांचे कुटुंब दिल्लीमधील आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. २२ एप्रिल रोजी, व्हान्स अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत. यामध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेल्या आमेर किल्ल्याचा समावेश आहे.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.