हैदराबाद- अमेरिकेनं इराणमध्ये घुसून हल्ला केल्यानंतर संतप्त झालेल्या इराणनं संपूर्ण जगावर परिणाम होईल, असा निर्णय घेतला आहे. इराणच्या संसदेनं होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यास मान्यता दिली आहे. असे असले तरी त्याबाबतचा अंतिम निर्णय इराणची सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषद घेणार आहे.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची दिलेली धमकी आता खरी करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. होर्मुझचा हा धोरणात्मक जलमार्ग जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक अडथळा आहे. इराणच्या संसदेनं इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्याचा बदला म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सागरीमार्गानं होणाऱ्या व्यापारावर निर्बंध येऊ शकतात. तसेच जागतिक तेलाच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो.
काय आहे होर्मुझची सामुद्रधुनी ?- ओमान आणि इराण दरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानच्या आखात आणि अरबी समुद्राशी जोडते. होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक केंद्र आहे. कारण या सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात म्हणजे जागतिक कच्च्या तेलाच्या व्यापाराच्या सुमारे १०० टक्के जागतिक तेल वाहतूक होते. होर्मुझची सामुद्रधुनी त्याच्या सर्वात अरुंद बिंदूवर अंदाजे १६१ किलोमीटर लांब आणि ३३ किलोमीटर रुंद आहे. दोन्ही दिशेनं शिपिंग लेन फक्त तीन किलोमीटर रुंद आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनीचं काय आहे महत्त्व-होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल तेल आणि तेल उत्पादनांची वाहतूक केली जाते. यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (EIA) नुसार, २०२२ मध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दररोज सरासरी २.१ कोटी बॅरल तेल वाहतूक झाली. ओपेक सदस्य असलेल्या सौदी अरेबिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि इराक त्यांचे बहुतेक कच्चे तेल या सामुद्रधुनीतून निर्यात करतात. त्याचबरोबर जगातील एक तृतीयांश द्रवस्वरुपातील नैसर्गिक वायूची (LNG) या जलमार्गातून वाहतूक होते. या सामुद्रधुनीला जगाची तेल धमनी म्हटलं जातं.
नाकाबंदीचे काय आहेत संभाव्य जागतिक परिणाम- या महत्त्वाच्या सामुद्रधुनीचा मार्ग बंद केला तर जलमार्गातून कच्च्या तेलाच्या वाहतुकीत तात्पुरता अडथळा येऊ शकतो. मात्र, पर्यायी मार्गामुळे जागतिक ऊर्जेच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. तसेच जलवाहतुकीच्या खर्चात वाढ आणि पुरवठा होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. तज्ञांच्या माहितीनुसार सामुद्रधुनीच्या नाकाबंदीमुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पुढे जाऊ शकतात.सामुद्रधुनी बंद झाल्यास आखातातून पेट्रोल आयात न करणाऱ्या देशांनाही मोठा फटका बसू शकतो. कारण पुरवठ्यात मोठी घट आणि जलवाहतुकीला लागणाऱ्या वेळेमुळे जागतिक बाजारात प्रति बॅरल किंमत वाढण्याची दाट शक्यता आहे.
कोणत्या देशावर काय होणार परिणाम
- होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याचा इस्रायलवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, इस्रायलकडून अझरबैजानमध्ये तेल वाहतूक केली जाते.
- इराण आणि चीनचे चांगले संबंध आहेत. मात्र, सामुद्रधुनी बंद झाल्यास चीनलादेखील फटका बसू शकतो. कारण, चीन हा एक प्रमुख तेल आयातदार आहे. इराणच्या तेल निर्यातीपैकी सुमारे तीन-चतुर्थांश चीनला निर्यात होते.
- होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुमारे दोन तृतीयांश कच्चे तेल आणि जवळपास भारताला लागणाऱ्या निम्म्या एलएनजीची भारत आयात करतो. नाकेबंदी झाल्यास भारतासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. भारत ७०% कच्च्या तेलाची आणि सुमारे ४०% एलएनजी आयात याच मार्गाने करतो. तेल आणि वायूच्या वाढत्या किमती वाढल्यास देशांतर्गत महागाई वाढवू शकते. विशेषतः वाहतूक आणि अन्न क्षेत्रात महागाई क्षेत्रात महागाई वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या आयात खर्चामुळे भारताच्या चालू खात्यातील तूट वाढेल. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होण्याची शक्यता आहे.
- सामुद्रधुनी बंद केल्याचा इराणलादेखील मोठा आर्थिक फटका बसेल. इराणसाठी आर्थिकदृष्ट्या संकट येऊन महागाई वाढण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये आर्थिक असंतोष निर्माण होऊन सध्याची राजवट अस्थिर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-